घरताज्या घडामोडीनागपूरात कोरोनाबाधितांचा आकडा ५७१ वर

नागपूरात कोरोनाबाधितांचा आकडा ५७१ वर

Subscribe

नागपूरमध्ये आतापर्यंत ५७१ जणांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे. तर आता नवीन भागातही कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून नागपूरमध्ये आतापर्यंत ५७१ जणांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे. तर आता नवीन भागातही कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. नागपूरातील गड्डीगोदाम, नाईक तलाव, लोकमान्य नगर, टिमकी हे काही नवीन भाग आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहेत. या भागात रुग्ण संख्या वाढत असून आज नागपूरात नव्या १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपूरातील कोरोनाबाधितांचा आकडा ५७१ वर पोहोचला आहे.

११ जणांचा कोरोमुळे मृत्यू

नागपूरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. आज चार रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ३८३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर नागपूरात कोरोनामुळे ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

- Advertisement -

नियम केले शिथिल

पाचवे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर नागपूरातील नियम शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांची रहदारी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

राज्यात सोमवारी २३६१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजार १३ झाली आहे. तसेच ७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २३६२ वर पोहोचली आहे. सोमवारी ७७९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने आजपर्यंत ३० हजार १०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडाळागाव ‘सील’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -