नागपूर मेट्रोचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते

पंतप्रधान कार्यालयाने महामेट्रोला ई-मेल पाठवून २ किंवा ३ मार्च रोजी पंतप्रधान नागपूर मेट्रोचा शुभारंभ करू शकतात असे कळवले आहे. नागपुरातील खापरी बर्डी या सुमारे १२ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

Nagpur
nagpur metro
नागपूर मेट्रो

नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने २० फेब्रुवारी रोजी महामेट्रोला ई-मेल पाठवून स्वीकृती दर्शवली आहे. त्यानुसार येत्या २ किंवा ३ मार्च रोजी पंतप्रधान नागपूर मेट्रोला हिरवा कंदिल दाखवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नागपुरातील खापरी बर्डी या सुमारे १२ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात यावा अशी विनंती महामेट्रो प्रशासनाने केली होती. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहारही झाला होता. परंतु, पंतप्रधान कार्यालयाकडून त्याला स्वीकृती मिळाली नव्हती. परंतु, २० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान कार्यालयाने महामेट्रोला ई-मेल पाठवून २ किंवा ३ मार्च रोजी पंतप्रधान नागपूर मेट्रोचा शुभारंभ करू शकतात असे कळवले आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नागपूर मेट्रोचा व्यावसायिक रन सुरू होणार आहे. विशेष म्हणजे नागपूर मेट्रोचा पायाभरणी समारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्तेच झाला होता.

असा उभा राहिला मेट्रोचा डोलारा

नागपूर मेट्रोचे बांधकाम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून एकूण १० वर्गवा-यांपैकी ७ विभागांचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये ५५८ पाईल, २६६ ओपन फाऊंडेशन, १२७ पाईल कॅप, ३५६४ सेगमेंट कास्टिंग, १४९ आय-गर्डर कास्टिंग, १४९ आय-गर्डर लॉन्चिंग आणि ३३ डेड स्लॅब कास्टिंगचा समावेश आहे. यासोबतच मेट्रोच्या ३९३ पैकी ३८८ पिअर , ३१८ पाईप कॅप, ३०८ पोर्टल आणि ३०९ सेगमेंट लॉन्चिंग असे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झालेय. महामेट्रोने दोन दिवसांपूर्वी ट्रायल रन घेतला असून सीताबर्डी ते खापरी दरम्यान व्यावसायिक रन साठी मेट्रो सज्ज असल्याची माहिती महामेट्रो प्रशासनाने दिली.

मेट्रोचे एकूण ११ स्टेशन्स असतील

नागपुरातील खापरी ते सीताबर्डी मेट्रो रेल्वे मार्ग १२.८७० कि़मी.चा असून या मार्गावर एकूण ११ स्टेशन आहेत. यामध्ये खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट, उज्ज्वलनगर, जेपी नगर, छत्रपती स्टेशन, अजनी, रहाटे कॉलनी, काँग्रेसनगर, सीताबर्डी स्थानकांचा समावेश असले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here