घरमहाराष्ट्रहत्या करुन महिलेच्या मृतदेहावर केला बलात्कार

हत्या करुन महिलेच्या मृतदेहावर केला बलात्कार

Subscribe

चंद्रशेखरने याच रागातून वहिणी प्रतिभा आणि तिच्या मुलीची हत्या केली असल्याचे त्यांनी पोलीस चौकशी दरम्यान सांगितले आहे. दोघींची हत्या गळा दाबून केली असल्याचे चंद्रशेखरने कबूल केले आहे.

नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वहिनीची हत्या करुन तिच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर-अमरावती महामार्गावरील वडधामना-सुराबर्डी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. आरोपीने आधी वहिनीची हत्या केली त्यानंतर तिच्या मुलीची हत्या केली. ऐवढ्यावरचं न थांबता त्याने वहिणीच्या मृतदेहावर बलात्कार केला आहे. पोलिसांनी अवघ्या ६ तासात आरोपीचा बेड्या ठोकल्या आहेत.

मृतदेहावर केला बलात्कार

२८ नोव्हेंबरला रात्री वडधामना-सुराबर्डी परिसरातील एका घरामध्ये एक महिला आणि ३ वर्षाच्या चिमुरडिची हत्या झाली होती. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. ३५ वर्षाच्या प्रतिभा बिंद आणि ३ वर्षाच्या रागिणी बिंद यांची हत्या करण्यात आल्याचे तपासातून समोर आले. दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून एक धक्कादायक बाब समोर आली. महिलेची आधी हत्या करण्यात आली त्यानंतर तिच्या मृतदेहावर आरोपीने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. प्रतिभाच्या दिरानेच तिची हत्या केली असल्याचे तपासात उघड झाले त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

- Advertisement -

घरी कोणी नसल्याचा घेतला फायदा

नागपूर-अमरावती महामार्गावरील वडधामना-सुराबर्डी परिसरात प्रतिभा बिंद आपल्या पती आणि मुलीसोबत राहत होत्या. प्रतिभाचे पती ट्रक ड्राईव्हरचे काम करतात. हत्या झाली द्या दिवशी ते नेहमीप्रमाणे ट्रक घेऊन बाहेरगावी निघून गेले होते. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपी चंद्रशेखरने प्रतिभा यांच्या घरी जाऊन तिच्याशी भांडण केले. या वादामध्ये चंद्रशेखरने रागात प्रतिभा हिची गळा दाबून हत्या केली. हा सर्व प्रकार पाहून प्रतिभाची तीन वर्षाची मुलगी रडू लागली. घडलेला प्रकार ती कोणाला तरी सांगेल त्यामुळे त्याने तिची सुध्दा हत्या केली. नराधम ऐवढ्यावरच न थांबता त्यांने प्रतिभाच्या मृतदेहावर बलात्कार केला.

आरोपीला अटक

दरम्यान, चंद्रशेखरचा भाऊ राकेशने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रतिभाशी आंतरधर्मीय लग्न केले होते. या लग्नामुळे राकेशचे कुटुंबिय नाराज झाले होते. चंद्रशेखरने याच रागातून वहिणी प्रतिभा आणि तिच्या मुलीची हत्या केली असल्याचे त्यांनी पोलीस चौकशी दरम्यान सांगितले आहे. दोघींची हत्या गळा दाबून केली असल्याचे चंद्रशेखरने कबूल केले आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

सापाचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्याला तोच साप डसला

धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -