नाभिकाची पोलिसांत तक्रार करणाऱ्या ग्राहकाची होणार दाढी, केस कापण्यासाठी वणवण

नाभिकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणाऱ्या ग्राहकाची आता दाढी आणि केस कापण्यासाठी वणवण होणार आहे. कारण नाभिक संघटनेने या ग्राहकाची दाढी आणि केस न कापण्याचा निर्णय घेतला आहे.

Nagpur
nagpur saloon sellers ban on customer who complaint in police station
नाभिकाची पोलिसांत तक्रार करणाऱ्या ग्राहकाची होणार दाढी, केस कापण्यासाठी वणवण

परवानगी शिवाय मिशी कापल्यामुळे एका ग्राहकाने नाभिकाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याची घटना नागपुरात घडली होती. तक्रारीनंतर आता नाभिक संघटनेने या ग्राहकाचे केस आणि दाढी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या ग्राहकाची दाढी, केस न कापण्याचा निर्णय ग्रामीण नाभिक संघटनेने घेतला आहे. या ग्राहकाचे नाव किरण ठाकूर असे आहे. नाभिक संघटना किरण ठाकूरच्या विरोधात आंदोलन देखील पुकारण्याची शक्यता आहे. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले आहे की, ‘किरणने याअगोदर अनेक वेळा मिशी कापली आहे. मात्र आता प्रसिद्धीरता या प्रकरणाचा गाजावाजा करत आहे.’

काय आहे नेमकं प्रकरण?

नागपुरच्या कन्हान येथील फ्रेन्ड्स मेन्स पार्लर येथे किरण ठाकूर मंगळवारी दुपारी ३ वाजता गेला होता. यावेळी त्याने दाढी आणि केस कापले. दरम्यान, नाभिक सुनील लक्षणे यांच्याकडून त्यांची मिसी कापली गेली. यावेळी किरण काही बोलला नाही. मात्र रात्री त्याने सलून मालकाला फोन करुन बाचाबाची केली. यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.


हेही वाचा – इन्स्टाग्राममधील चूक शोधली आणि झाला लखपती