Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सेक्स करताना 'कुछ नया' करण्याच्या भानगडीत तरुणाचा मृत्यू!

सेक्स करताना ‘कुछ नया’ करण्याच्या भानगडीत तरुणाचा मृत्यू!

या प्रकरणी पोलिसांनी तरुणाच्या प्रेयसीला केले अटक

Related Story

- Advertisement -

नागपुरातील एका हॉटेलमध्ये प्रेयसीसह शारीरिक संबंध ठेवताना तरूणाचा गळफास लागून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान शरीर संबंध ठेवताना काही तरी वेगळं करण्याच्या नादात गळफास लागून तरूणाच्या जीवावर बेतलं आणि त्याने आपला जीव गमावला. या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. तरूणाच्या मृत्यूच्या वेळी खोलीमध्ये प्रेयसी उपस्थित असल्याने प्रेयसीला आरोपी बनवत तिला अटक करण्यात आले आहे तर तरूणाच्या वडिलांनी आपल्या मुलाची हत्या झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

असा घडला प्रकार

७ जानेवारी रोजी हा प्रकार नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा भागात असणाऱ्या महाराजा लॉजमध्ये घडला. मृत पावलेला तरूण २७ वर्षाचा असून तो इंजिनिअर होता. हा तरूण आणि त्याची २२ वर्षीय मैत्रीण यांच्यात गेल्या ५ वर्षांपासून प्रेम संबंध होते. दरम्यान त्यांनी फिरायला जाण्याचे नियोजन केले आणि ते दोघेही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव रंगारी परिसरात असलेल्या महाराजा लॉजमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी एक खोली बुक केली. यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. दरम्यान काही तरी वेगळं करण्याचा प्रस्ताव तरूणाने आपल्या प्रेयसीपुढे ठेवला आणि तिने तो मान्यही केला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दोरीच्या सहाय्याने तरुणीने खुर्चीवर तरुणाचे हात आणि पाय दोरीने बांधले. ही दोरी नंतर त्याच्या गळ्याच्या भोवती सुद्धा गुंडाळली. थोड्या वेळाने तरुणी स्वच्छतागृहात गेली. मात्र, खुर्चीवर दोरीने बांधलेला तरुण त्याच अवस्थेत होता. काही वेळाने तो खुर्चीवरून खाली कोसळला. कोसळून पडल्याने गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला आणि गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणी स्वच्छतागृहातून बाहेर येईपर्यंत तरुणाचा मृत्यू झाला होता. घाबरलेल्या परिस्थितीत तरूणीने त्वरीत लॉज व्यवस्थापकांची मदत मागितली. यानंतर त्यांनी या संदर्भातील सर्व माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी केलेल्या तपासणीदरम्यान बांधलेल्या दोरीने गळा आवळल्याने तरूणाता मृत्यू झाला, असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी त्यांच्या आकस्मात मृत्यूची मोंद केली होती. दरम्यान आपल्या मुलाची हत्या झाली असल्याची तक्रार तरूणाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मृत्य तरूणाच्या प्रेयसीला बेड्या घातल्या आहेत.

- Advertisement -