घरमहाराष्ट्रउपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

Subscribe

उदयसिंग पाडवी यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

गेल्या वर्षभरात पाडवी यांचा भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास झाला आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी आमदाराने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून पुढील राजकीय प्रवास सुरू केला आहे. उदयसिंग पाडवी यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

- Advertisement -

पक्षप्रवेशावेळी अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर तांगुळी, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार महिला जिल्हाध्यक्षा हेमलता पाटील उपस्थित होते.

उदयसिंग पाडवी यांच्याबद्दल…

२०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातून उदयसिंग पाडवी हे आमदार होते. परंतु, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शहाद्यातून उदयसिंग यांच्याऐवजी पुत्र राजेश पाडवी यांना तिकीट देण्यात आलं. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या उदयसिंग पाडवी यांनी पक्षांतर करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर शहादाऐवजी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून ते रिंगणात उतरले होते. परंतु त्यांना मतदारांनी साथ दिली नाही.

- Advertisement -

दरम्यान, नंदुरबार मतदारसंघातून त्यांनी भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांच्याविरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. नंदुरबार जिल्ह्यात उदयसिंग पाडवी भाजपमध्ये असताना त्यांच्यातील अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात उघड झाले.


Video: ‘आज मेरा घर टुटा है, कल तेरा घमंड तुटेगा..’ कंगनाने मुख्यमंत्र्यावर साधला निशाणा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -