घरमहाराष्ट्र'आघाडी शिवसेनेला उल्लू बनवतंय'

‘आघाडी शिवसेनेला उल्लू बनवतंय’

Subscribe

सत्तास्थापन करण्यासाठी भाजप प्रयत्नशील

नारायण राणे आणि शिवसेना वाद काही नवा नाही मात्र आता सत्ता स्थापनेमध्ये राज्यपालाकडे बहुमत सिद्ध न करू शकलेल्या शिवसेनेवर नारायण राणे यांनी टीका केली आहे. काँग्रेसचे नेते समोर काय बोलतात पाठी मागे काय बोलतात हे उद्धव ठाकरे यांना समजले पाहिजे, असे म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला उल्लू बनवायचे काम करायत आहे अशी टीका नारायण राणे यांनी माध्यमाशी बोलताना केली. वर्षां येथे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली यावेळी नारायण राणे हे देखील उपस्थित होते. आज महाशिव आघाडीच्या अनेक बैठक झाल्या पण अजून तोडगा निघाला नाही त्यामुळे शिवसेना त्या दोघांबरोबर जाऊ शकेल, असे मला वाटत नाही असे देखील ते म्हणालेत.

सत्ता येण्यासाठी जे शक्य आहे ते करेन 

दरम्यान यावेळी नारायण राणे आज मी मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हा मी मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापण करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. तसेच सत्ता येण्यासाठी जे शक्य असेल ते करीन असे देखील राणे यावेळी म्हणालेत. एवढच नाही तर मला आशा की भाजपची सत्ता येईल. सत्ता स्थापन करायला भाजपला मी मदत करीन असे देखील ते म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, ‘सेना काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही. सध्या शिवसेनेची वागणूक ही नैतिकतेला धरून नाही. त्यामुळे आघाडीकडून सेनेला उल्लू बनवण्याचे काम सुरू आहे.’असे खोचक वक्तव्य देखील राणेंनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

राष्ट्रपती राजवटीला शिवसेना जबाबदार 

राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीला शिवसेना जबाबदार असल्याची टीका नारायण राणे यांनी करत, निवडणुकी आधी युती झाली हे नैतिकतेला धरून नसल्याची टीका केली. एवढच नाही तर सत्ता स्थापनेला विलंब होतो हे योग्य नसल्याचे सांगत जनतेची ज्यांना काळजी आहे असे शिवसेना सांगत आहे पण यांच्यामुळे विलंब होत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

राज्यात ‘मिशन लोटस’ कार्यन्वित

नारायण राणेंनी आज मुख्यमंत्र्याची भेट घेतली असून मुख्यमंत्र्यांनी कामाला लागा, अशी सूचना देखील यावेळी दिली आहे. यावेळी ‘आम्ही राज्यपालांकडे रिकाम्या हाती जाणार नाही तर १४५ जणांची यादी घेऊन भाजप राज्यपालांकडे जाणार.’, असे वक्तव्य देखील राणेंना केले आहे. त्यामुळे राज्यात ‘मिशन लोटस’ कार्यन्वित होणार असे एकंदरीत चित्र राजकीय वर्तुळात दिसतंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -