घरमहाराष्ट्रलवकरच मुंबईत माझा भाजपप्रवेश होईल - नारायण राणे

लवकरच मुंबईत माझा भाजपप्रवेश होईल – नारायण राणे

Subscribe

नारायण राणेंंनी स्वत: लवकरच मुंबईत माझा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होईल असं जाहीर केलं आहे.

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता असून शिवसेनेचा त्यांच्या प्रवेशाला विरोध आहे, असं सांगितलं जात होतं. तसंच, भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे नारायण राणेंचा भाजप प्रवेश रखडल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता खुद्द नारायण राणे यांनीच आपण भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगितलं आहे. ‘लवकरच मी माझा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असून मुंबईतच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल’, असं नारायण राणेंनी सांगितलं. कणकवलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचं स्वागत केल्यानंतर नारायण राणेंनी पत्रकारांशी बोलताना हा खुलासा केला आहे. त्याशिवाय, ‘माझा मुलगा भाजपच्याच तिकिटावर निवडणूक लढवेल’, असं देखील राणेंनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेची काय असेल भूमिका?

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. शिवसेनेचा अंतर्गत विरोध असल्यामुळे भाजप पक्षातून देखील त्यांच्या पक्षप्रवेशाविषयी निश्चित घोषणा केली जात नव्हती. मात्र, त्याआधीच नारायण राणेंनी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली आहे. तसेच, आपला पक्षप्रवेश इतर कुठेही होणार नसून तो मुंबईतच होईल, असं देखील ते म्हणाले. त्यामुळे आता शिवसेनेची यावर काय प्रतिक्रिया असेल, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

‘मुख्यमंत्र्यांचं स्वागत हे माझं कर्तव्य’

दरम्यान, अद्याप भाजपकडून प्रवेशावर कोणतीही निश्चित भूमिका घेतली जात नसताना देखील महाजनादेश यात्रा कणकवलीत आली आली असता नारायण राणेंनी स्वत: मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. यावरून चर्चा सुरू झाल्यानंतर पत्रकारांनी राणेंना याविषयी विचारलं असता ‘मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्यच होतं’, अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -