घरमहाराष्ट्रमी एनडीएसोबतच राहणार - नारायण राणे

मी एनडीएसोबतच राहणार – नारायण राणे

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महाआघाडीत सामिल होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या चर्चेवर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीए सोबतच राहणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महाआघाडीत सामिल होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी आपला पक्ष एनडीए सोबत राहणार असल्याचे सांगत आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम दिला. तसेच निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार असतील, असे सांगत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चेला देखील त्यांनी पूर्ण विराम दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी ‘राणे आपलेच’ असे वक्तव्य केले होते. त्यावरून निलेश राणे राष्ट्रवादी काँग्रेसमधून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढणार, अशी चर्चा होती. मात्र ही निवळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या विरोधात लढणार

नारायण राणे यांनी सांगितले की, जरी आमचा पक्ष एनडीए सोबत असला तरीदेखील आमची लढाई ही शिवसेनेसोबत असणार आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या विरोधात लढू. एवढंच नाही तर रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेचा उमेदवार जरी असला तरी आम्ही आमची उमेदवारी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. ‘आम्हाला कोण मदत करेल? कोण नाही? याची अपेक्षा देखील नाही. तसेच जे पाठिंबा देतील त्यांचा पाठिंबा स्वीकारणार’, असे नारायण राणे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -