घरमहाराष्ट्रडॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरण : कळसकर आणि अंदुरेने झाडल्या गोळ्या

डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरण : कळसकर आणि अंदुरेने झाडल्या गोळ्या

Subscribe

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणातील मोठा खुलासा समोर आला असून याप्रकरणी कळसकर आणि अंदुरेने झाडल्या गोळ्याची कबुली दिली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणातील मोठा खुलासा समोर आला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीत त्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाड्याची कबुली दिली आहे. ‘मी आणि सचिन अंदुरेने गोळीबार केला‘, असे कळसकरने सीबीआयने केलेल्या न्यायवैद्यकीय चाचणीत म्हटले आहे. याबाबत सीबीआयकडून मंगळवारी विशेष न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला आहे.

सहा जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

कळसकरची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, या चाचणीत कळसकर आणि अंदुरेने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती कळसकरने दिली आहे. सीबीआयकडून या संबंधीचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर करण्यात आला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत त्याचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांचे सुद्धा नाव घेतले आहे. सीबीआयकडून या संबंधीचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर करण्यात आला. शरद कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत त्याचे वकील संजीव पुनाळेकर यांचे सुद्धा नाव घेतले आहे. रविवारी पुणे न्यायालयाने संजीव पुनाळेकर यांना सहा जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

मागच्यावर्षी जून महिन्यात ‘मी पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मला दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता’, अशी कबुली कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत दिला आहे. सीबीआयने २५ मे रोजी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केली होती.


हेही वाचा – डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: पुनाळेकर आणि भावेंच्या कोठडीत वाढ

- Advertisement -

हेही वाचा – नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी संजीव पुनाळेकर, विक्रम भावेंना अखेर अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -