नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू

प्रसुतीनंतर रक्तदाबाचा त्रास होवू लागल्यामुळे प्रकृती खालावल्याने सदर महिलेचा मृत्यू झाला.

Civil_Hospital
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय

प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या मृत्यूची घटना आज गुरुवारी दुपारी घडली. प्रसुतीनंतर रक्तदाबाचा त्रास होवू लागल्यामुळे प्रकृती खालावल्याने सदर महिलेचा मृत्यू झाला. स्वाती आशुतोष खंगरे (२३, रा. सिद्धेश्वरनगर, जेलरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अशी घडली घटना

पोलिसांच्या माहितीनुसार, स्वाती खंगरे हिला मंगळवारी (दि.१९) प्रसुती वेदना सुरु झाल्या. प्रसुतीसाठी तिला आई सविता मधुकर मोरे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. बुधवारी (दि.२०) रात्री १ वाजेदरम्यान तिने मुलीला जन्म दिला. प्रसुतीनंतर तिला रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा गुरुवारी दुपारी दीड वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.