घरमहाराष्ट्रनाशिकमध्ये तोंडाला मास्क न लावल्याने तरुणावर गुन्हा दाखल

नाशिकमध्ये तोंडाला मास्क न लावल्याने तरुणावर गुन्हा दाखल

Subscribe

मास्क न वापरल्याने नाशिकमध्ये अशाप्रकारचा हा राज्यातील पहिला गुन्हा दाखल

जगभर कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असताना महाराष्ट्रात आलेल्या संवेदनशील परिस्थिती विरोधात प्रशासन दोन हात करून लढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत लोकांनी विनाकारण घराबाहेर न पडता आपल्याच घरी सुरक्षित राहवं यासाठी प्रशासन आणि प्रसार माध्यमाद्वारे नागरिकांना वारंवार कळकळीचे आवाहन देखील केले जात आहे. यासह सोशल डिस्टंसिंगचे आवाहन करण्यात आले असून ते पाळले गेलेच पाहिजे, यासाठी प्रशासन विनंती करत आहे. मात्र या नियमांना अनेकांकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे नाशिकात उघड झाले आहे.

राज्यात पहिला गुन्हा दाखल

सोशल डिस्टंसिंगसह मास्क न लावणाऱ्यांवर नाशिक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मास्क न वापरल्याने नाशिकमध्ये अशाप्रकारचा हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलीस स्टेशन आवारात घडला आहे. कोणतीही परदेश प्रवासाची पार्श्वभूमी नसताना देखील नाशिकमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडल्याने शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. त्यामुळे या रुग्णाने प्रशासनाची काळजी वाढवली आहे.

- Advertisement -

निफाड तालुक्यातील तरुणाविरुद्ध पहिला गुन्हा

यामुळे नाशिकमध्ये लॉकडाऊन असताना कोणी घराबाहेर पडल्यास त्यावर पोलिसांची नजर असणार आहे. दरम्यान तोंडाला मास्क न लावल्याने राज्यातील पहिला गुन्हा निफाड तालुक्यातील डोंगरगावचे पांडुरंग दत्तू आव्हाड या तरुणाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. तसेच एका व्यक्तीमुळे इतरांना त्रास होईल अशी वर्तवणूक केल्यास आयपीसी १८८ कलम अंतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे.


Corona: नाशिकमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला; परदेश प्रवासाची पार्श्वभूमी नाही!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -