घरमहाराष्ट्रत्र्यंबकेश्वरमध्ये पाणी, तर नाशिक जव्हार वाहतूक बंद

त्र्यंबकेश्वरमध्ये पाणी, तर नाशिक जव्हार वाहतूक बंद

Subscribe

गेल्या २४ तासांत त्र्यंबकेश्वर आणि जव्हार, मोखाडा परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांवर पुन्हा पाणी साचले होते. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकराज मंदिरातही पाणी शिरले होते. दरम्यान मोखाड्याजवळ पूल वाहून गेल्यामुळे नाशिकत्र्यंबकेश्वरजव्हार ही वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

त्र्यंबक पासून 25 किमी अंतरावर असलेल्या मोरचुंडी तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथे नदीवर असलेला पूल खचला आहे. आज सकाळी झालेल्या मुसळधार पाऊसमुळे ही घटना घडली आहे. मोखाडा शहराचा त्र्यंबकेश्वरशी संपर्क तुटला आहे. तर नाशिक, त्र्यम्बकेश्वर कडून जव्हार कडे जाणारी वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. दरम्यान त्र्यंबक शहरात सकाळी रस्त्यावर साचलेले पाणी आता ओसरू लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -