पॉझिटिव्ह सरासरीत नाशिकने टाकले मालेगावला मागे

Nashik

मालेगावात करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होवून आता नाशिक शहरात बाधितांची संख्या वाढू लागल्याचे गेल्या चार दिवसांतील आकडेवारीवरुन समोर आले आहे. मागील चार दिवसांत मालेगावात २०, तर नाशिक शहरात २७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनास शनिवारी (दि.२३) दिवसभरात तीन टप्प्यात प्राप्त रिपोर्टमध्ये 22 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात नाशिक शहरातील- ८, मालेगाव ४, मौजे सुकेणे येथील २६ वर्षीय युवती, उगावमधील- २, पांगरी (ता.सिन्नर)- २, येवला-१, पाथरे शेंबे (ता. चांदवड)- १, मनमाड- २ आणि कणकोरी (ता.सिन्नर) येथील १२ वर्षीय मुलाचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये शहरातील आगर टाकळी येथील आरोग्य सेवकही आहे. त्याचा यापूर्वीच मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या ४८ वर पोहोचली आहे.

नाशिक शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे मुंबई किंवा मालेगाव कनेक्शन समोर येत आहे. शनिवारी दुपारी शहरातील कॉलेज रोड भागात असलेल्या विसेमळा येथील ५१ वर्षीय पोलीस आणि राणाप्रताप चौक, सिडकोतील ३४ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. बाधित पोलीस कर्मचारी हा मालेगावात बंदोबस्तासाठी गेलेला होता. त्याचे सलग दोन रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, तिसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
जिल्हा प्रशासनास शनिवारी सायंकाळी ७६ अहवाल प्राप्त झाले. यात १० रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये मौजे सुकेणे येथील २६ वर्षीय युवतीसह उगाव-२, पांगरी (ता. सिन्नर) २, येवला १, पाथरे शेंबे (ता. चांदवड) १, मनमाड २ आणि कणकोरी (ता. सिन्नर) येथील १२ वर्षीय मुलाचा समावेश आहे. शनिवारी सायंकाळी पुन्हा शहरातील सहा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. यात नाईकवाडी ४, भारतनगर, शिवाजीवाडी १, आगर टाकळी येथील एकाचा समावेश आहे.

शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण

विसेमळा, कॉलेज रोड (१), राणाप्रताप चौक, सिडको (१), नाईकवाडी (४), भारतनगर,शिवाजीवाडी (१), आगर टाकळी (१)

२४५ अहवाल प्रलंबित

9 हजार ५४७ संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये ९१४ पॉझिटिव्ह व ८३८८ निगेटिव्ह रिपोर्ट आले असून जिल्ह्यातील एकूण २४५ अहवाल प्रलंबित आहेत. त्यातील ४६ नाशिक ग्रामीण, ३३ नाशिक शहर, १६६ मालेगाव शहरातील आहेत.

५५ रुग्ण दाखल

नाशिक जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ५५ संशयित रुग्ण उपचारार्थ रुग्णालयात दाखल झाले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालय १४, नाशिक महापालिका रुग्णालये २५, मालेगाव महापालिका रुग्णालय ९ आणि नाशिक ग्रामीण रुग्णालयात ७ रुग्ण दाखल झाले आहेत.

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण —९24
नाशिक शहर —-75 (मृत ४)
मालेगाव —-689 (मृत ४४)
नाशिक ग्रामीण—१२१
अन्य ——–३९

एक प्रतिक्रिया

  1. मालेगाव मधे आम्ही करीना फ्री मालेगाव ही मोहिं मोतीवाला होमियोपैथिक कॉलेज तर्फे हाती घेतली होती ,13 में पासून आम्ही जवळपास 5 लाख लोकांना Ars Alb 30 मोफत वाटले आणि मि स्वतः आमच्या टीम सोबत कोरोना रुग्णा वर होमियोपैथिक उपचार ही केलेत , हां त्याचाच परिणाम आहे ,, डॉ लियाक़त नामोले , 9850080193

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here