नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी कोरोना पॉझिटिव्ह

गंभीर बाब म्हणजे त्यांनी गेल्या शनिवारीच महापालिकेच्या कोषगारातील तिजोरीचे पूजन केले होते. त्यांच्या समवेत आयुक्त कैलास जाधव, स्थायी समिती सभापती गणेश गिते, भाजप गटनेता जगदीश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे आता या सर्वांचीच कोरोना टेस्ट आता केली जाणार आहे.

Satish Kulkarni

नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गंभीर बाब म्हणजे त्यांनी गेल्या शनिवारीच महापालिकेच्या कोषगारातील तिजोरीचे पूजन केले होते. त्यांच्या समवेत आयुक्त कैलास जाधव, स्थायी समिती सभापती गणेश गिते, भाजप गटनेता जगदीश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे आता या सर्वांचीच कोरोना टेस्ट आता केली जाणार आहे.

त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांचीही आता कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून महापौरांनी पुरेशी काळजी घेत महापौरपदाची धुरा सांभाळली आहे. या काळात त्यांना भेटायला येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी होती. त्यातच त्यांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात जनसंवाद कार्यक्रमही सुरु केला. त्यात नागरिक येऊन आपले नागरी प्रश्न मांडतात. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना महापौरांची उपस्थिती असते. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन आणि सॅनिटायझरचा योग्य तो वापर करुन महापौर कार्यरत असले तरीही दिवाळी नंतर त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांच्या कार्याला आता काही दिवसांसाठी ब्रेक लागणार आहे. त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा वैभव कुलकर्णी यांचीही टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. महापौरांच्या कुटुंबाचीही आता टेस्ट करण्यात येणार आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांची प्रकृत्ती चिंताजनक नसल्याचे त्यांचे पूत्र वैभव कुलकर्णी यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले. त्यांना सध्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लक्ष्मीपूजनावेळी महापौरांनी आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजन केले
लक्ष्मीपूजनावेळी महापौरांनी आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजन केले

हे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची होणार टेस्ट

नाशिक महापालिकेच्या कोषगारातील तिजोरीचे महापौर सतीश कुलकर्णी व त्यांची पत्नी वैशाली कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त कैलास जाधव व त्यांची पत्नी निना जाधव, स्थायी समिती सभापती गणेश गिते व त्यांची पत्नी दिपाली गिते, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, नगरसेविका वत्सला खैरे, शहर अभियंता संजय घुगे, मुख्य लेखाधिकारी नरेंद्र महाजन, उप मुख्य लेखाधिकारी गुलाब गावित,जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, मोहन ठाकरे, अजय कमोद, कैलास दराडे, अजय शिरसाठ, वैभव कुलकर्णी, चारुदत्त जाधव, आयान गिते, दादाभाऊ चौरे, हंसराज वर्मा, गोकुळ राऊत, मनीष कांबळे, वैभव मोटकरी, अरुण महाले, धनंजय सोनवणे, रवी पवार, संतोष कान्हे,  हुसेन पठाण, विशाल घागरे ,विश्वास जोगी, सुनील मोरे, दप्तरे आदी उपस्थित होते. या सर्वांची कोवीड टेस्ट आता महापालिकेला करावी लागणार आहे.