घरमहाराष्ट्रनाशिकभरलेल्या सिलेंडरमधून गॅसचोरी प्रकरणी एकाला अटक

भरलेल्या सिलेंडरमधून गॅसचोरी प्रकरणी एकाला अटक

Subscribe

या आरोपीकडून २१ सिलेंडर, दोन वाहने, मशीन नाशिक पोलिसांनी जप्त केले आहे.

नाशिकमध्ये घरगुती सिलेंडरचा काळाबाजार सुरुच असल्याचे पोलीस कारवाईवरून दिसून येत आहे. घरगुती सिलेंडरमधील गॅस बनावट मशीनने खासगी वाहनांमध्ये भरताना शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता बाळकृष्णनगर, पंचवटी येथे एकाला अटक केले. त्याच्याकडून २१ घरगुती सिलेंडर, दोन मारुती व ओमनी वाहने, एक गॅस भरण्यासाठीचे मशीन असा एकूण एक लाख १४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कैलास त्र्यंबक पिंगळे (४२, रा.मेहरधाम, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

बनावट मशीनद्वारे सिलेंडरमधून केली जात होती गॅसचोरी 

शहर पोलीस आयुक्तालय स्तरावर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पथक तैनात केले आहेत. पथकास गुरुवारी दुपारी १२ वाजता म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीतील बाळकृष्णनगर, पिंगळेमळा, मेहरधाम, पंचवटी येथे बेकायदा सिलेंडरमधील गॅस खासगी वाहनांमध्ये बनावट मशीनद्वारे भरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिरसाठ, पोलीस नाईक सारंग वाघ, पोलीस शिपाई सुरज गवळी यांनी बाळकृष्णनगर येथे छापा टाकला. त्यावेळी कैलास पिंगळे घराच्या पाठीमागे मशीनद्वारे सिलेंडर खासगी वाहनात भरताना निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्याकडून २१ घरगुती सिलेंडर, दोन मारुती व ओमनी वाहने, एक गॅस भरण्यासाठीचे मशीन असा एकूण एक लाख १४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये सिलेंडरचा काळाबाजार सुरुच

पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असली तरी शहर सिलेंडर काळाबाजार सुरुच असल्याचे कारवाईवरून दिसून येत आहे. २ जानेवारी २०१९ रोजी विडी कामगारनगर गंगोत्री विहार परिसरात भारत गॅस एजन्सीच्या वितरकाकडे काम करणार्‍या चौघा डिलिव्हरी बॉयला आडगाव पोलिसांनी भरलेल्या गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी करताना मुद्देमालासह पकडले. त्यांच्याकडून घरगुती वापराचे तब्बल २९ सिलेंडर, गाडी असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मार्च महिन्यात उपनगर पोलिसांनी प्रत्येक सिलेंडरमधून थोडा थोडा गॅस काढून रिकाम्या सिलेंडरमध्ये भरताना एकास अटक करत ४८ सिलेंडर जप्त केले. जानेवारी महिन्यात म्हसरुळमध्ये शहर पोलिसांनी डिलीव्हर बॉयला सिलेंडरसह अटक केली होती.


हेही वाचा – वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -