घरमहाराष्ट्रनाशिक जिल्हा परिषद,पंचायत समिती पोटनिवडणूक १२ डिसेंबरला!

नाशिक जिल्हा परिषद,पंचायत समिती पोटनिवडणूक १२ डिसेंबरला!

Subscribe

गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्यावेळी नाशिक जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. जिल्हा परिषदेच्या तीन व पंचायत समितीच्या दोन जागांसाठी गुरुवार, १२ डिसेंबर रोजी मतदान आणि दुसर्‍याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार धनराज महाले शिवबंधन तोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. जिल्हा परिषदेच्या खेडगाव (ता.दिंडोरी) येथील सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी ही निवडणूक लढवली. महालेंच्या प्रवेशामुळे खासदार डॉ.भारती पवार यांना खो बसला आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परिणामी, पक्षांतर केल्यामुळे त्यांनीही जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत ही निवडणूक लढवली. त्या कळवण तालुक्यातील मानूर गटाच्या सदस्य होत्या. दोघांच्या लढतीत डॉ.पवार यांनी विजयश्री मिळवत दिल्ली गाठली. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक तालुक्यातील गोवर्धन गटाचे सदस्य आमदार हिरामण खोसकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

- Advertisement -

पक्षांतर करुन निवडणूक लढवल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेचा राजीनामा दिला आहे. या तीन गटांसोबत कनाशी (ता.कळवण) येथील पोटनिवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांनी अद्याप सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नसल्यामुळे या जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झालेली नाही.न्यायडोंगरी (ता.नांदगाव) व नांदुडी (ता.निफाड) येथील पंचायत समितीची पोटनिवडणूक होत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रिक्त झालेल्या जागांसाठी आता इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन दाखल करणे-२२ ते २७ नोव्हेंबर
दाखल अर्ज छाननी-२८ नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज माघार-४ डिसेंबर
पात्र उमेदवारांना निशाणी-४ डिसेंबर
वैध उमेदवारांची यादी-५ डिसेंबर
अपिलात गेलेल्या उमेदवारांची यादी-७ डिसेंबर
मतदानाची तारीख-गुरुवार १२ डिसेंबर
मतमोजणी-शुक्रवार १३ डिसेंबर

- Advertisement -

येथे होणार निवडणूक

मानूर (ता.कळवण), खेडगाव (ता.दिंडोरी), गोवर्धन (ता.नाशिक), न्यायडोंगरी (ता.नांदगाव), नांदुडी (ता.निफाड)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -