घरताज्या घडामोडीगुजरात लगतच्या सीमा बंदीस्त

गुजरात लगतच्या सीमा बंदीस्त

Subscribe

जिल्हा परिषद ग्राम पंचायत विभागाचे आदेश; 5 टक्के कर्मचार्‍यांनाच हजर राहण्याचे आदेश

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशसानासोबतच जिल्हा परिषदेनी तातडीच्या उपाययोजना सुरु केल्या असून, जिल्ह्यातील गुजरात लगतच्या सीमा सील केल्या आहेत. त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, मालेगाव व बागलाण येथील ग्राम पंचायतींना विशेष सूचना देवून नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या आदेशान्वये उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे ग्रामीण भागातील प्रामुख्याने मोठ्या ग्रामपंचायतींना सतर्क राहण्याचे आदेश दिले. कोरोनाग्रस्त गावपातळीवर येऊ नये यासाठी गावांमध्ये सर्वे करण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
प्रत्येक विभाग प्रमुखांनी विभागातील कर्मचार्‍यांचे वेळापत्रक तयार केले असून, कर्मचार्‍यांना आळीपाळीने कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे सोमवारी (दि.23) कार्यालयांमध्ये 5 टक्के कर्मचारी उपस्थित होते. कृषी, पशुसवंर्धन, ग्रामपंचायत, समाजकल्याण, लघुपाटंबधारे विभाग बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट होता.
&.
ग्रामपंचायतींना सतर्क राहण्याचे आदेश
आतापर्यंत करोनाचे रूग्ण शहरी भागा आढळून आले आहे. मात्र, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होता कामा नये, यासाठी दक्ष राहण्याचे आदेश अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिले. त्यानुसार, ग्रामपंचायतचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांनी सोमवारी (दि.23) व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवकांशी संवाद साधला. मुंबई, पुणेमध्ये करोना वाढल्याने येथील विद्यार्थी, पालक गावाकडे येऊ लागले आहे. गावात बाहेरून आलेल्यांवर वॉच ठेवण्यात यावा. कोरोनाची लक्षणे गावात दवंडी पिटवून सांगण्यात यावी. सरपंच व ग्रामसेवकांनी गावात राहून, गर्दी होणार नाही याचा विशेष दक्षता घ्यावी. बाहेरून अथवा दुसर्‍या जिल्हयातून आलेल्यांवर नजर ठेवावी अशा सूचना परदेशी यांनी यावेळी दिल्या. प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, बागलाण, मालेगाव, सिन्नर, सुरगाणा  या तालुक्यातील ग्रामपंचायतीं लगत इतर जिल्हयांच्या सीमा आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींनी विशेष दक्ष राहण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -