दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका घरी तपासणार

Nashik
exam

नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना तपासण्यासाठी घरी मिळणार आहेत. उत्तरपत्रिकांची योग्य ती काळजी घेवून दि.10 जून पूर्वी निकाल लागतील या स्वरुपाचे नियोजन सुरु केले आहे.
शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीची परीक्षा दि. 3 मार्च ते 23 मार्च या कालावधीत झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर स्थगित करण्यात आला आहे. तसेच इयत्ता बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 या कालावधीत पार पडली. या दोन्ही परीक्षांचे पेपर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांकडून तपासले जातात. त्यांचे योग्य मूल्यांकन होण्यासाठी शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात ते तपासले जावून जून महिन्यात निकाल जाहीर होतो. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळेत येऊन उत्तरपत्रिकांचे परीक्षण व नियमन करण्यात अडचणी येत आहेत. दोन्ही परीक्षांचे निकाल वेळेत लागणे आवश्यक असल्याने बोर्डाने खास बाब म्हणून केवळ या परीक्षेच्या उत्तरपत्रिका पुढील अटी व शर्तींच्या अधिन राहून माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना परिक्षण व नियमनासाठी घेरी देण्यात येणार आहेत.
…बोर्डाच्या विशेष सूचना
-उत्तरपत्रिका मोजून व सुस्थितीत असल्याची खातरजमा करुन शिक्षकांनी, मुख्याध्यापक किंवा महाविद्यालय प्रमुखांकडून ताब्यात घ्याव्यात.
-उत्तरपत्रिकांचे परिक्षण करताना पूर्णत: गोपनियता राखण्याची दक्षता घ्यावी
-उत्तरपत्रिकांचे परिक्षण वेळेत पूर्ण करुन संबंधितांकडे हस्तांतरीत करा
-उत्तरपत्रिका खराब होणार नाही अथवा गहाळ होणार नाही याची काळजी घ्या

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here