घरताज्या घडामोडीगावठी कट्टा पुरवठा करणारा मुख्य आरोपी जाळ्यात

गावठी कट्टा पुरवठा करणारा मुख्य आरोपी जाळ्यात

Subscribe

ठाणे येथील कळवा पूर्व भागात वीर युवराज मेडिकलमध्ये गोळीबार करणार्‍या सराईत गुन्हेगारास गावठी कट्टा पुरवठा करणार्‍या मुख्य आरोपीस नाशिक शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातून अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व आठ जीवंत काडतुसे जप्त केले आहेत. त्यास पथकाने नाशिकला आणत न्यायालयात हजर केले आता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कैलाससिंग गुरुमुखसिंग भाटिया (४७, रा.सिंघना, कुकसीरोड, ता.मनावर, जि.धार, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

ठाणे येथील कळवा पूर्व भागात २७ डिसेंबर रोजी रात्री वीर युवराज मेडिकलमध्ये मेडीकलमध्ये दुकानमालक रामसिंग राजपुरोहित यांचा भाचा प्रेमसिंग राजपूत झोपला होता. सर्फराज हरून अन्सारी (२६, रा. रांची, झारखंड) याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. प्रेमसिंगवर त्याने गोळीबार केला. त्यात प्रेमसिंगचा मृत्यू झाला. अन्सारीने दुकानातील ८ हजार ६५० रुपये घेत फरार झाला. १६ जानेवारी रोजी त्यास निलगिरी बाग झोपडपट्टी (आडगाव) येथून नाशिक शहर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी गावठी कट्टा, ३ काडतुसे, कटावणी, दुचाकी (एमएच १५डी ४८५८), दोन हजार रुपये, मोबाईल जप्त केला. पोलीस कोठडीत त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने गावठी कट्टा मनवार (मध्यप्रदेश) येथील कैलास ऊर्फ महाराज याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशात छापा टाकला. गुन्ह्यातील आरोपी व गुन्हेगारांना गावठी कट्टा पुरवठा करणारा मुख्य आरोपी कैलाससिंग भाटिया यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व आठ जीवंत काडतुसे जप्त केली. त्यास नाशिकला आणत जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -