घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा परिषदेत संशयीतांचा वावर?

जिल्हा परिषदेत संशयीतांचा वावर?

Subscribe

नाशिक : आर्थिक वर्ष संपण्यावर असताना प्रत्येक ठेकेदाराला त्याचे बील काढण्याची घाई झाली आहे. चांदवड तालुक्यातील एका अंगणवाडीचे बील मंजूर करण्यासाठी पुण्याहून प्रवास करुन आलेला एक ठेकेदार थेट सोमवारी (दि.23) जिल्हा परिषदेत पोहोचल्याने सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

चांदवडमधील जिल्हा परिषदेच्या अभियंत्याने तयार केलेले अंगणवाडीचे बील जिल्हा परिषदेमध्ये पोहोचवायचा असल्याने तो थेट येथे पोहोचला. त्याला प्रवेश नाकारण्यात आला तरी, त्याने हाताळलेले बील हे कधीतरी येथे दाखल केले जाईल. जिल्हा परिषदेच्या 14 टेबलवर ते फिरणार आहे. परिचरपासून ते कार्यकारी अभियंता तसेच क्लार्कपासून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यापर्यंत जाणार आहे. दोन दिवसांपूर्वीच हा ठेकेदार पुण्याहून पब्लिक ट्रान्सपोर्टने खचाखच भरलेल्या रेल्वे किंवा बसने मनमाडला आले होते. त्यादरम्यान ही व्यक्ती इतर लोकांच्या संपर्कात आली असेलच. कोणत्याही व्यक्तीला करोना संसर्ग झाला आहे किंवा नाही हे सात ते आठ दिवस समजत नाही. मग अशा परिस्थितीत त्याने हाताळलेले बिल जिल्हा परिषदेमध्ये फिरवायचे का, हा मोठा प्रश्न जिल्हा परिषद सदस्यांना पडला आहे. परंतु, कितीतरी ठेकेदार किंवा त्यांचे प्रतिनिधी जिल्हा परिषदमध्ये बिल फिरण्यासाठी येतात तालुका मुख्यालयापासून जिल्हा मुख्यालयपर्यंत प्रवास करतात. मग जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांच्या संपर्कात येतात, अशा परिस्थितीत काय करायचे? सोमवारीच सुरगाणा येथून काय ठेकेदार बिल घेऊन निघाले. त्यांना जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश जरी मिळाला नाही तरी त्यांनी हाताळलेली कागदपत्रे जिल्हा परिषदेमध्ये फिरवायची का, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासमोर उपस्थित केला आहे.
&
टेबल टू टेबलचा धोका!
‘पीएमएस’मध्ये आपल्याला घरून काम करण्याची सुविधा दिली आहे. अगदी क्लार्क पासून ते कार्यकारी अभियंता व मुख्य लेखा, वित्त अधिकारी यांना लॉगीन दिले आहे.
बील ऑनलाईन फॉरवर्ड होऊ शकते, ते बिल परत ऑफलाइन टेबल टू टेबल  फिरवणे धोक्याचे नाही का?
&.प्रतिक्रिया
‘पीएमएस’चा उपयोग काय?
जिल्हा परिषदेमध्ये सुदैवाने प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस) लागू आहे. त्याचा फायदा आपण करून घेऊ शकत नाही का? या भयंकर परिस्थितीत बीलाची हार्ड कॉपी किंवा प्रिंटाआउट टेबल टू टेबल फिरवणे गरजेचे आहे का? असा प्रश्न भाजपचे गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी उपस्थित केला आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -