घरमहाराष्ट्रनाशिकबॉम्बच्या अफवेमुळे कामायनी तीन तास खोळंबली

बॉम्बच्या अफवेमुळे कामायनी तीन तास खोळंबली

Subscribe

लोकमान्य टिळक टर्मिनस- वाराणसी (कामायनी) एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या फोनमुळे इगतपुरी रेल्वे स्थानकात थांबवून प्रवाशांच्या सामानाची झडती घेण्यात आली. मात्र, कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून न आल्याने अखेर ६.१५ ला गाडी तीन तास थांबवून पुढे वाराणसीला सोडली.

कामायनी एक्सप्रेसच्या एस-४ या बोगीत बॉम्ब असल्याचा फोन अजय यादव या इसमाने ठाणे ग्रामीण पोलिसांना केला. इगतपुरी येथील लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजोग बच्छाव, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक एस. एस. बर्वे व स्टेशन प्रबंधक प्रेमचंद आर्या यांच्या पथकाने रेल्वे स्थानकात धाव घेऊन एक्सप्रेसला रेल्वे स्थानकात थांबवून सामानाची कसून झडती घेतली. मात्र, काहीच मिळुन न आल्याने त्यांनी या घटनेची खबर नाशिक येथील बॉम्बशोध पथकाला कळवली. बॉम्बपथक व डॉग स्कॉडने बोगीतील सर्व प्रवाशांना खाली उतरवून झडती घेतली. मात्र, काहीच न आढळल्याने प्रवाशांसह पथकाने निश्वास सोडला. अखेर गाडी तीन तासानंतर सोडली. यावेळी पोलीस निरीक्षक मुरारी गायकवाड, हवालदार हेमंत घरटे, दिगंबर पालवे, सचिन देसले, गणेश वराडे, दत्तात्रय आहेर, एस. एस. त्रिपाठी, अंबादास कातोरे, एस. के. अमृतकर, डी. एन. अजबे, आर. व्ही. मोरे, व्ही. बी. इंगळे, विशाल पाटील, तुकाराम आंधळे आदींनी मोहीमेत भाग घेतला. अफवेमुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -