घरताज्या घडामोडीमहिला अत्याचाराविरोधात भाजपचा आक्रोश

महिला अत्याचाराविरोधात भाजपचा आक्रोश

Subscribe

राज्यात वाढते महिला व बालिकांवरील अत्याचार, बलात्कार, कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणारे अतिप्रसंग याविरोधात राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपच्या महिला मोर्चातर्फे शहरात विविध ठिकाणी आक्रोश आंदोलन करण्यात आले.

‘महिलांवर अत्याचार होत असताना निर्लज्जपणे बघ्याची भूमिका घेणार्‍या सरकारचा धिक्कार असो’, ‘राज्य सरकार करतय काय? खाली डोकं वरती पाय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणला. आंदोलनात भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार प्रा. देवयानी फरांदे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, महिला मोर्चा अध्यक्ष हिमगौरी आडके, संध्या कुलकर्णी, रोहिणी नायडू, सुनील बागूल, प्रशांत जाधव, सुनील केदार, पवन भगूरकर, जगन पाटील, अमित घुगे आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. सिडको, सातपूर, पंचवटी कारंजा येथे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. तसेच त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले. पंचवटीतील आंदोलनात चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्ञानेश्वर काकड, गणेश गीते, रंजना भानसी, जगदीश पाटील, प्रियंका माने, अरुण पवार, सुरेश खेताडे, पुनम धनगर, दिगंबर धुमाळ, धनंजय माने, मनीष बागूल, विजय बनछोडे, ऋषिकेश आहेर, अनिल वाघ आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.

- Advertisement -

सातपूर येथे एल्गार; पोलिसांकडून हस्तक्षेप
सातपूर मंडलतर्फे आमदार सीमा हिरे, भाजप सातपूर महिला मोर्चा अध्यक्षा संगीता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली अशोकनगर बस स्टॉप येथे महिला अत्याचाराविरोधात एल्गार करण्यात आला. यावेळी शहर उपाध्यक्ष वर्षा भालेराव, शहर चिटणीस माधुरी बोलकर, नगरसेविका इंदुबाई नागरे, हेमलता कांडेकर, पल्लवी पाटील, भाजप सातपूर मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -