घरमहाराष्ट्रनाशिकपहिल्या दोन तासांत १० टक्के मतदान, ४८ यंत्रे बदलली

पहिल्या दोन तासांत १० टक्के मतदान, ४८ यंत्रे बदलली

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेच्या पहिल्या दोन तासांतच नाशिक लोकसभा मतदार संघातील मतदानाने १० टक्क्यांचा आकडा गाठला होता.

लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेच्या पहिल्या दोन तासांतच नाशिक लोकसभा मतदार संघातील मतदानाने १० टक्क्यांचा आकडा गाठला होता. दरम्यान, मतदानापूर्वी सदोष आढळलेली ४८ मतदान यंत्रे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बदलली.

सिन्नरमध्ये १४, नाशिक पूर्व – ८, नाशिक मध्य -७, नाशिक पश्चिम – ४, देवळाली – ६ आणि इगतपुरी येथील ९ यंत्रे बदलण्यात आली. या यंत्रणांमध्ये काही मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट आणि काही कंट्रोल युनिट्सचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक मतदान यंत्राची चाचणी घेतली जाते. या चाचणीदरम्यान ही यंत्रे सदोष आढळून आली होती. ती लगेचच अधिकाऱ्यांनी बदलली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -