घरमहाराष्ट्रनाशिकबी. एड. प्रवेश अर्ज ‘फ्रीज’साठी हजाराचा भुर्दंड

बी. एड. प्रवेश अर्ज ‘फ्रीज’साठी हजाराचा भुर्दंड

Subscribe

पहिल्या गुणवत्ता यादीत साडेतीनशे विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; बुधवारपर्यंत अंतिम मुदत

शिक्षक होण्यासाठी आवश्यक बी. एड. या दोन वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शनिवारी प्रसिध्द झाली असून, जिल्ह्यातील सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांत प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमानुसार महाविद्यालय मिळालेले नाही, त्यांना प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज पुढील फेरीसाठी ‘फ्रीज’ करावा लागेल व त्यासाठी एक हजार रुपयांचे ऑनलाईन चलन भरणे अनिवार्य आहे. केवळ प्रवेश अर्ज कायम ठेवण्यासाठी हजार रुपये भुर्दंड सहन करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

राज्यातील 509 महाविद्यालयांतील सुमारे 45 हजार जागांसाठी तब्बल 52 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्याआधारे पहिली गुणवत्ता यादी शनिवार (दि.7) रोजी प्रसिद्ध झाली असून त्यांना 11 सप्टेंबरपर्यंत प्रवेश दिले जाणार आहेत. यानंतर दुसरी गुणवत्ता यादी 13 किंवा 14 सप्टेंबर रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत सुमारे 20 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली असली तरी ज्या विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळालेले नाही, त्यांना आपला अर्ज ‘फ्रीज’ करावा लागेल. त्यासाठी एक हजार रुपयांचे ऑनलाईन चलन भरावे लागणार असून, जे विद्यार्थी हे चलन भरुन अर्ज फ्रीज करतील अशाच विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवेश दिला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना हजार रुपये विनाकारण द्यावे लागत असल्याने त्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत 18 महाविद्यालये व तीन महाविद्यालये मुंबई येथील एसएनडीटी विद्यापीठाच्या अंतर्गत आहेत. जिल्ह्यात एकूण सोळाशे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

- Advertisement -

तथापि, अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती व खासगी शिक्षण संस्थांमधे शिक्षकांना अनुदानीत करण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे बी. एड. या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे बी. एड्. महाविद्यालयांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली होती. मात्र, शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बदल केला असून, बी.एड् हा अभ्यासक्रम चार वर्षांचा करण्याचे धोरण ठरवले आहे. त्यामुळे यंदा प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना दोनच वर्षात ही पदवी प्राप्त होईल. तसेच पुढील वर्षी प्रवेश घेतल्यास चार वर्ष अवधी लागेल, अशी भिती विद्यार्थ्यांंच्या मनात आहे. या विषयी विद्यार्थ्यांमध्ये बराच खल झाल्यामुळे अनेकांनी इच्छा नसताना देखील प्रवेश घेण्याची तयारी दर्शवल्याने शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.

असा घ्या प्रवेश

विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यांनी आपल्या लॉनइन आयडी व पासवर्डचा वापर करुन, गुणवत्ता यादीची प्रिंट आऊट घ्यावी. त्या आधारे शैक्षणिक कागदपत्रांची पुर्तता करुन महाविद्यालयात थेट प्रवेश घेता येइल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही त्यांना ऑनलाईन अर्ज फ्रीज करावा लागेल. दुसरी गुणवत्ता यादी 13 किंवा 14 सप्टेंबर रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.

- Advertisement -

पुढील फेर्‍यांमध्ये महाविद्यालयातील प्रवेश पूर्ण होतील

मविप्र शिक्षण संस्थेच्या अ‍ॅड. हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात 66 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. यापुढील फेर्‍यांमध्ये महाविद्यालयातील प्रवेश पूर्ण होतील. प्रवेशासाठी उमेदवारांना एसएमएस प्राप्त झाले आहेत.
-डॉ.चंद्रकांत बोरसे, प्राचार्य, अ‍ॅड.विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -