घरताज्या घडामोडीस्कार्पिओच्या चोर कप्यातून १२ लाखांच्या मद्याची वाहतूक

स्कार्पिओच्या चोर कप्यातून १२ लाखांच्या मद्याची वाहतूक

Subscribe

गुजरातमधील दोघांना अटक; एक्साईजची कारवाई

नाशिक : महाराष्ट्रात बंदी असलेली व दादरा नगर हवेली निर्मित बेकायदा मद्याची वाहतूक रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागास यश आले आहे. स्कार्पिओच्या चोर कप्यात मद्याची वाहतूक करणार्‍या गुजरातमधील दोघांना पथकाने बुधवारी (दि.१४) मध्यरात्री हरसूल पेठ रोडवरील धानपाडा शिवारात अटक केली. त्याच्याकडून पथकाने स्कार्पिंओसह सव्वाबारा लाखांची दारू जप्त केली. मिनेशभाई कांतीलाल पटेल (३० रा.कुरगावमदन ता.धरमपुर) व जयेशभाई अरविंदभाई हडपती (३४ रा.सलवानगाव ता.वापी जि.बलसाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

बेकायदा मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती दुय्यम निरीक्षक अरूण सुत्रावे यांना मिळाली. बुधवारी मध्यरात्री पथकाने हरसूल पेठ मार्गावर सापळा लावला असता ही कारवाई करण्यात आली. भरधाव येणार्‍या स्कार्पिओ(जीजे ०१ केएम ९३८७)चा भरारी पथक एकने पाठलाग करत थांबवला. पथकाने वाहनाची तपासणी केली असता स्कार्पिओमध्ये बनवलेल्या चोर कप्यात राज्यात बंदी असलेला आणि दादर नगर हवेली निर्मित रॉयल स्टॅग, इम्प्रीयल ब्ल्यू, जॉन मार्टीन व्हिस्कीसह कासबर्ग, ट्युबर्ग,किंगफिशर बिअर आदींची खोकी मिळून आली. पथकाने दोघांना अटक करून वाहनासह १२ लाख १३ हजार ०४० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दुय्यम निरीक्षक राम सुपेकर जवान विलास कुवर, सुनिल पाटील,धनराज पवार अनिता भांड आदींच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक सुत्रावे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -