घरताज्या घडामोडीमालेगावात दोन पोलीस कोरोनाबाधित; 12 नवे पॉझिटिव्ह

मालेगावात दोन पोलीस कोरोनाबाधित; 12 नवे पॉझिटिव्ह

Subscribe

मालेगावात कोरोनाचा विस्फोट झाला असून, मंगळवारी (दि.२८) दुपारी जिल्हा रुग्णालयास मालेगावातील 114 रुग्णांचे रिपोर्ट प्राप्त झाले. त्यातील 102 रिपोर्ट निगेटिव्ह असून 12 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकट्या मालेगावातील करोनाबाधितांची संख्या 171 झाली असून, जिल्ह्यात एकूण 193 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे.

सोमवारी मालेगावातील ४३९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, आज सकाळी ३६ व दुपारी 12 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग हादरून गेला आहे. 36 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 22 पुरुष व 14 महिलांचा समावेश आहे. चार पॉझिटिव्ह रुग्णांचे दुसऱ्यादा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मालेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. तरीही, मालेगावात कोरोनाचे थैमान सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -