घरमहाराष्ट्रनाशिकजुगार अड्ड्यावर छापा ; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त, १४ जण ताब्यात

जुगार अड्ड्यावर छापा ; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त, १४ जण ताब्यात

Subscribe

पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

भगूर येथे वर्षांनुवर्षांपासून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी, २४ एप्रिलला रात्री टाकलेल्या छाप्यात १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटना स्थळावरून १४ जणांना ताब्यात घेण्यात आले.

भगूर येथील बस स्टेशनमागील शेडमध्ये कित्येक वर्षांपासून हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, कर्मचारी उत्तम जगदाळे, सुदाम झाडे, संतोष मुळे, श्रीराम सपकाळ, अनिल दिघोळे, संजय गामणे, रावजी मगर, यादव डंबाळे यांचा पथकात समावेश होता. यावेळी जुगार खेळणारे विजय माधवराव भागवत, सुरेश भागवत भोळे, देविदास लक्ष्मण सोमवंशी, गौतम रामभाऊ जगताप, त्र्यंबक रघुनाथ जाधव, संदीप अशोक भागवत, रामदास मुरलीधर रोकडे, सुधीर जगन्नाथ साळवे, उत्तम सुकदेव काळे, अनिल भास्कर घाडगे, सुनिल रामदास गायधनी, मोहन एकनाथ कातकाडे, विलास भागिनाथ चांदे. गंगाराम शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांच्याकडून ५१ हजार ४९० रुपये रोख व १२ लाख सहा हजार रुपये किमतीची वाहने जप्त केली. स्थानिक पोलिसांच्या कारवाईपासून अनेक वर्ष सहीसलामत राहिलेल्या या अड्ड्यावरील कारवाईची भगूर परिसरात जोरदार चर्चा होत. देवळाली कॅम्प पोलिसांनी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण ढगे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -