घरताज्या घडामोडीनाशिक जिल्ह्यात १६ नवे करोनाबाधित

नाशिक जिल्ह्यात १६ नवे करोनाबाधित

Subscribe

नाशिक जिल्हा प्रशासनास मंगळवारी (दि.२) 16 नवे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये नाशिक शहर ८, नांदगाव २, इगतपुरी ३, मालेगाव, कणकोरी, सोनेवाडी (ता.सिन्नर) येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मंगळवारी दिवसभरात दोन बाधितांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात आजवर एकूण १ हजार २७६ रुग्ण करोनाबाधित सापडले असून, ७५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात २३७ रुग्ण बाधित असून, ८५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, एकूण ११ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मालेगावात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले असले तरीही नाशिक शहरात वडाळागाव, पेठरोड, मार्केटयार्ड करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. मंगळवारी शहरात नवीन ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. वडाळारोड येथील १ (मृत), कामटवाडा, त्रिमूर्ती चौक १, गंगापूर रोड १, शिवसमर्थ नगर १, सादिकनगर, वडाळागाव १, रोहिणीनगर, पेठरोड १, नाशिक शहरातील २ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शहरात एकूण ३३ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. जिल्ह्यातील संशयित १२ हजार ४७० रुग्णापैकी १० हजार ६३५ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अद्याप ५५९ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ७५, नाशिक शहर १३९, मालेगाव शहर ३४५ रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

५३ रुग्ण दाखल
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ५३ संशयित रुग्ण उपचारार्थ रुग्णालयात दाखल झाले. यामध्ये जिल्हा रुग्णालय ५, नाशिक महापालिका रुग्णालय २९, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय १, मालेगाव महापालिका रुग्णालय ८, नाशिक ग्रामीण रुग्णालयात १० संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रुग्ण – १२७६ (मृत ७५)
नाशिक शहर-२३७ (बरे ८५, मृत ११)
नाशिक ग्रामीण-१९७ (बरे १०६,मृत ५)
मालेगाव शहर-७८२ (बरे ६३८,मृत५५)
अन्य – ६० (बरे ४३,मृत४)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -