घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यात १६५ मतदान केंद्रे संवेदनशील

जिल्ह्यात १६५ मतदान केंद्रे संवेदनशील

Subscribe

जिल्ह्यात प्राथमिक निकषांच्या आधारे १६५ मतदान केंद्र हे संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक म्हणजे ३१ केंद्र ही एकटया नाशिक पश्चिम मतदारसंघातील आहेत.

जिल्ह्यात प्राथमिक निकषांच्या आधारे १६५ मतदान केंद्र हे संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक म्हणजे ३१ केंद्र ही एकटया नाशिक पश्चिम मतदारसंघातील आहेत. सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी एक संवेदनशील मतदान केंद्र येवला ,निफाड या दोन मतदारसंघात आहे. देवळाली, चांदवड, मालेगाव बाह्य व मालेगाव मध्य या चार मतदारसंघात या स्वरुपाचे एकही मतदान केंद्र नाहीत.

गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ९४ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे पुढे आले. गत लोकसभा निवडणुकीत ६४ संवेदनशील मतदान केंद्र असल्याचे समोर आले. मागील निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर ७५ ते ८० टक्कयांच्या पुढे मतदान झाले असेल, ज्या मतदान केंद्रांवरील एकूण मतदानापैकी ५० टक्कयांहून अधिक मतदान एकाच उमेदवाराला झाले असेल याचा अभ्यास करून व्हनरेबल मतदान केंद्र ठरविण्यात आले आहेत. नाशिक पश्चिम या एकाच मतदारसंघात थोडी थोडकी नव्हे तर, ३१ मतदान केंद्रे संवेदनशील गटाच्या यादीत समाविष्ट आहेत. त्या खालोखाल नाशिक मध्य मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघात २० मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे निवडणूक शाखेने जाहीर केले आहे. नांदगाव मतदार संघात १२, बागलाण ३, कळवण ९, चांदवड ५, येवला १, सिन्नर ५, निफाड १, नाशिक पूर्व २, नाशिक मध्य २०, नाशिक पश्चिम ३१ व इगतपुरी मतदारसंघात ५ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -