घरमहाराष्ट्रनाशिकदेशातून १७ लाख टन साखर निर्यात

देशातून १७ लाख टन साखर निर्यात

Subscribe

बांग्लादेश, श्रीलंका, सोमालिया, इराण या देशांतून मागणी वाढली ; राज्यातील कारखान्यांना दिलासा

ज्ञानेश उगले

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर निर्यातीत तीन पटीने वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते एप्रिलच्या पहिल्या सप्ताहाअखेर या कालावधीत देशातून १७ लाख टन साखर बांगलादेश, श्रीलंका, सोमालिया आणि इराण या देशांमध्ये निर्यात झाली आहे. राज्यातील कारखान्यांपुढे अतिरिक्त उत्पादनाचे संकट उभे असतांना झालेल्या निर्यातीचे कारखानदारीला दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत ५० लाख टन साखर निर्यात करण्याचा कोटा केंद्र सरकारने दिलेला होती. यापैकी १७ लाख टन साखर निर्यात झालेली आहे . या निर्यातीत आठ लाख टन कच्च्या साखरेचा समावेश आहे. याव्यतिरिक्त साडेचार लाख टन साखर ही निर्यातीच्या प्रक्रियेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण २७ लाख टन साखरेचे करार झाले आहेत या पैकी प्रक्रियेत असणार्‍या साखरेसह २१ लाख टन साखर ही परदेशात निर्यात होईल असे या सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये भारताकडून फक्त पाच लाख टन साखरेची निर्यात झाली होती. अशी माहिती ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या सूत्रांनी दिली.

अनुदानाचा निर्यातीला लाभ

परदेशांमध्ये साखरेचे दर खाली असल्याने कारखान्यांना निर्यातीचा धोका पत्करला नव्हता. यामुळे ही निर्यात झाली नव्हती. परंतु सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने जादा साखर उत्पादनाची भीती असल्याने कारखान्यांनी तातडीने साखर निर्यात करावी, असे आवाहन केले. तसेच साखर निर्यातीला अनुदान देण्याची घोषणा केली होती. यामुळे निर्यातीत वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बांगलादेश, श्रीलंका, सोमालिया आणि इराण या देशांमध्ये अधिक साखर निर्यात झाल्याचे शुगर ट्रेड असोसिएशनकडून सांगण्यात आले. यंदा देशात साखरेचे उत्पादन जादा होण्याची शक्यता आहे. अजूनही अनेक भागांमध्ये गळीत हंगाम सुरू आहे. यामुळे तीनशे लाख टनांहून अधिक उत्पादन साखरेचे होईल अशी शक्यता आहे.

- Advertisement -

पुढील हंगामात साखरेचा साठा जास्त प्रमाणात शिल्लक राहण्याची शक्यता असल्याने देशातील कारखान्यांनी गेल्या महिन्यापासून साखरेची निर्यात करण्यास प्रारंभ केला आहे. निर्यात केल्याशिवाय कोणतेही अनुदान देणार नसल्याचे केंद्राने सांगितल्याने कारखान्यांनी मिळेल त्या दरात साखर निर्यात करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. ऑक्टोबर ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्याअखेर राज्यातील १०६ सहकारी साखर कारखार्‍यांनी ४ लाख टन साखर निर्यात केली आहे. एकूण करार ६ लाख टन साखरेचे झालेले आहेत. राज्याला या कालावधीत १० लाख टन साखर निर्यात करण्याचा कोटा केंद्राने सहकारी साखर कारखान्याना दिला होता. परंतु, कारखान्यांनी चालढकल केल्याने मार्च पर्यंत निर्यातीची गती धीमी होती. परंतु, एप्रिलच्या सुरवातीपासून कारखान्यांनी निर्यातीच्या हालचाली वाढवल्याचे महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -