घरताज्या घडामोडीजिल्हयाला १८०० मेट्रीक टन तांदुळ उपलब्ध

जिल्हयाला १८०० मेट्रीक टन तांदुळ उपलब्ध

Subscribe

रेशनकार्ड नसलेल्यांना मिळणार पाच किलो मोफत तांदूळ

रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत तांदुळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानूसार नाशिक जिल्हयात तहसिलदारांमार्फत रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबियांची नाव नोंदणी करण्यात येत असून ही माहीती संकलित झाल्यानंतर साधारणपणे पुढील आठवडयापासून या व्यक्तींना मोफत तांदुळ वाटप केले जाईल. याकरीता जिल्हयाला १८०० मेट्रीक टन तांदूळ उपलब्ध झाल्याची माहीती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली.

करोना लॉकडाऊन काळात अन्नसुरक्षा योजनेंतर्गत मे ते जून असे तीन महीन्यांचे धान्य देण्यात आले. याव्यतिरिक्त प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहेत. मे महीन्यात १ लाख ८८ हजार ८८ शिधापत्रिकाधारकांना ४ हजार ६५९ मेट्रीक टन तांदूळ तसेच १६४ मेट्रीक टन डाळ वितरीत करण्यात आली. परंतु ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, किंवा ज्यांनी रेशनकार्डसाठी पुरवठा विभागाकडे अर्ज केला आहे. अशा कुटुंबियांना कोणतेही धान्य अद्यापपर्यंत मिळाले नाही. याकरीता राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रियमंत्री रामविलास पासवान यांच्याशी चर्चा करून रेशनकार्ड नसलेले, बेघर, स्थलांतरित, कामगार व अडकून पडलेल्या गरीब व गरजू नागरीकांना मोफत तांदूळ देण्याबाबतची मागणी केली. त्यानूसार आता या कुटुंबियांनाही प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ देण्यात येणार आहे. राज्यातील ७० लाख कुटुंबियांना याचा लाभ मिळणार असून नाशिक जिल्हयात अशा कुटुंबियांची माहीती संकलन करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी दिले आहे. तसेच नागरीकांनी रेशन दूकानदारांकडे नोंदणी करावी असेही आवाहन केले आहे. जिल्हयासाठी १८०० मेट्रीक टन तांदूळ उपलब्ध करून देण्यात आल्याची माहीती जिल्हा पूरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली.

- Advertisement -

फॉर्म भरण्याची गरज नाही
जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व धान्य वितरण अधिकारी, नाशिक व मालेगाव यांच्यातर्फे त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयाशी किंवा स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क साधून आपले नाव व आधार क्रमांकाची माहिती द्यावी, जेणेकरून विनाशिधापत्रिकाधारक यांची अद्ययावत यादी तयार करून त्यांना मोफत तांदूळ वाटप करता येईल. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, अशा गरीब व गरजूंना आपली तत्काळ नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबियांची माहीती संकलित केली जात आहे. याकरीता रेशन दूकानदारांनाही रजिस्टरवर अशा नोंदी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही माहीती संकलित होताच पुढील आठवडयापासून या लाभार्थ्यांना ५ किलो मोफत तांदूळ वितरीत केला जाईल.
– डॉ. अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -