घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यात साडेतीन महिन्यांत २४ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

जिल्ह्यात साडेतीन महिन्यांत २४ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

Subscribe

नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून सिन्नर व मालेगाव तालुक्यातील दोन शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून सिन्नर व मालेगाव तालुक्यातील दोन शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. जिल्ह्यात यावर्षी एप्रिलच्या मध्यापर्यंत आजपर्यंत २४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

सिन्नर तालुक्यातील मर्‍हळ बुद्रूक येथील संतोष कारभारी शेळके (वय ४२) या शेतकर्‍याने शुक्रवारी त्याच्या भावाच्या गट क्रमांक ३५ मधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी, १३ एप्रिलला सकाळी ही घटना उघडकीस आली. कर्जाला कंटाळून या शेतकर्‍याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मर्‍हळ बुद्रुक-सुरेगाव रस्त्यावरील शेळके वस्तीवर हा प्रकार घडला. शेळके यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी आत्महत्या केली. शेळके यांनी शेतीसाठी विकास सोसायटीचे ७५,००० रुपयाचे कर्ज घेतलेले होते. त्याच्या मागे पत्नी, दोन लहान मुले व आई असा परिवार आहे. वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एस. सद्गीर तपास करत आहे. अशीच घटना मालेगाव तालुक्यातील नरडाणे येथे घडली. बाजीराव त्र्यंबक भामरे (वय ६०) या वयोवृद्ध शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

- Advertisement -

दोन वर्षांपासून शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सरकारने आत्महत्या रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या. राज्य सरकारने शेतकर्‍यांचे सरसकट दीड लाख रुपयांचे कर्ज माफ केले, तर केंद्र सरकारनेही चालू वर्षापासून शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. सरकारच्या या मदतीमुळे शेतकर्‍यांंच्या आत्महत्या रोखल्या जातील, असे वाटत असताना चालू वर्षीदेखील जानेवारी महिन्यांपासून शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटनांची दखल घेण्यात आली असून, महसूल व पोलीस खाते घटनेचे कारण शोधत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -