घरताज्या घडामोडीcorona : दिवसभरात 24 रुग्णांचा मृत्यू; 2310 कोरोनामुक्त, 1176 बाधित

corona : दिवसभरात 24 रुग्णांचा मृत्यू; 2310 कोरोनामुक्त, 1176 बाधित

Subscribe

नाशिक जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार घातला असून, गुरुवारी (दि.24) दिवसभरात 2 हजार 310 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1 हजार 176 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण 374, नाशिक शहर 745, मालेगाव 40 आणि जिल्ह्याबाहेरील 17 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 24 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात नाशिक शहर 10, नाशिक ग्रामीणमधील 12 आणि मालेगाव व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी एका रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजवर 60 हजार 298 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण 14 हजार 485, नाशिक शहर 4२ हजार 650, मालेगाव २ हजार 867, जिल्ह्याबाहेरील २96 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ७ हजार 282 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ३ हजार 115, नाशिक शहर 3 हजार 514, मालेगाव 547 आणि जिल्ह्याबाहेरील 106 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 1 हजार ८७1 हून अधिक संशयित रुग्ण उपचारार्थ विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले. त्यात जिल्हा रुग्णालय 16, नाशिक महापालिका रुग्णालय 1 हजार 723, एमव्हीपी रुग्णालय 17, मालेगाव रुग्णालय २२, नाशिक ग्रामीण रुग्णालय 213 रुग्ण दाखल झाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -