घरमहाराष्ट्रनाशिकनाव नोंदणीसाठी पाच हजार अर्ज

नाव नोंदणीसाठी पाच हजार अर्ज

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवारी राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत नवीन नाव नोंदणीसाठी जिल्हाभरातून अडीच हजार अर्ज प्राप्त झाले. शनिवार आणि रविवार दोन दिवस राबविण्यात आलेल्या या मोहीमेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद लाभल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर यांनी सांगितले.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी पुनरिक्षण कायर्र्क्रम हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी करणे, दुबार, मयत मतदारांची नावे वगळणे, नावात बदल, पत्ता बदल यासारख्या दुरुस्त्या करण्यात येत आहेत. याकरता शनिवार आणि रविवार दोन दिवस राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत फॉर्म ६ नाव नोंदणी, फॉर्म ७ नाव कमी करणे फॉर्म ८ नावात दुरूस्ती, फॉर्म ८ अ पत्ता बदल याकरता एकूण ७ हजार १५४ अर्ज प्राप्त झाले. सर्वाधिक अर्ज नवीन नाव नोंदणीसाठी प्राप्त झाले तर दुबार, मयत मतदारांचे नाव कमी करणे याकरता १३२३ अर्ज प्राप्त झाले. नावात दुरुस्तीसाठी ८१५ तर पत्ता बदलसाठी १७१ अर्ज प्राप्त झाल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी सांगितले.जिल्ह्यातील १५ तालुक्यांत मतदान केंद्रावर राबवण्यात आलेल्या या मोहिमेत अनेक जागरूक मतदारांनी केंद्रावर येऊन मतदार यादीत नाव आहे की नाही याची खातरजमा केली. तसेच अनेकांनी नाव नोंदणीसाठी अर्जही सादर केले.

- Advertisement -

तालुकानिहाय प्राप्त अर्ज

नांदगाव ३४४, मालेगाव मध्य २८१, मालेगाव बाहय २७८, बागलाण ३७१, कळवण २८८, चांदवड ३९२, येवला २२४, सिन्नर ११६७, निफाड ८४ १९२, दिंडोरी ४३१, नाशिक पूर्व १३८, नाशिक मध्य २४७, नाशिक पश्चिम २४६, देवळाली १०६, इगतपुरी १४०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -