जिल्ह्यात २७४ मतदान केंद्रांची भर

नाशिक २ लाख १० हजार मतदांराची भर पडल्याने जिल्ह्यातील मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार आता पूर्वीच्या ४,४४६ मतदान केंद्रांमध्ये २७४ मतदान केंद्रांची भर पडली असून, आता जिल्ह्यात ४,७२० मतदान केंद्र अंतिम करण्यात आली आहेत. यात सर्वाधिक ९३ मतदान केंद्रे मालेगाव शहरात वाढली आहेत.

Nashik

नाशिक २ लाख १० हजार मतदांराची भर पडल्याने जिल्ह्यातील मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार आता पूर्वीच्या ४,४४६ मतदान केंद्रांमध्ये २७४ मतदान केंद्रांची भर पडली असून, आता जिल्ह्यात ४,७२० मतदान केंद्र अंतिम करण्यात आली आहेत. यात सर्वाधिक ९३ मतदान केंद्रे मालेगाव शहरात वाढली आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात मतदार याद्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. दुसर्‍या टप्प्यात मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शहरी भागातील मतदान केंद्रांसाठी १४०० तर ग्रामीण भागातील केंद्रासाठी १२०० मतदारांची मर्यादा ठरवून देण्यात आली. या मर्यादेपेक्षा अधिकचे मतदार असल्यास नवीन केंद्र निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. निवडणूक शाखेने जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील ४४४६ सर्वेक्षण केले. त्यांनतर आयोगाच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या मतदान नोंदणी मोहीमेत २ लाख १० हजार नवमतदारांची भर पडली. यात ६० हजार नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे. वाढीव मतदारांसाठी मतदान केंद्रांची पुनर्रचना करताना मतदान केंद्र वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यात काही मतदान केंद्रांवर मर्यादेपक्षा मतदारांची संख्या जास्त असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानुसार आता २७४ मतदान केंद्रांची भर पडली
आहे. आता जिल्ह्यात ४४२० मतदान केंद्रे अंतिम करण्यात आली आहेत.

नवे मतदान केंद्रे अशी

नांदगाव : १२, मालेगाव मध्य : ९३, मालेगाव बाह्य : २१, बागलाण : ४, कळवण : ००, चांदवड : ३, येवला :४, सिन्नर : २०, निफाड : ०१, दिंडोरी : १, नाशिक पूर्व : ६०, नाशिक मध्य : ०५, नाशिक पश्चिम : २६, देवळाली : २३, इगतपुरी : १.

तालुकनिहाय एकूण मतदान केंद्र

नांदगाव : ३३८, मालेगाव मध्य : ३१५, मालेगाव बाह्य : ३२९, बागलाण : २८४, कळवण : ३३८, चांदवड : २९७, येवला : ३१६, सिन्नर : ३२९, निफाड : २७२, दिंडोरी : ३२३, नाशिक पूर्व : ३५५, नाशिक मध्य : २९९, नाशिक पश्चिम : ३६५, देवळाली : २७०, इगतपुरी : २८९.