घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये १३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू

नाशिकमध्ये १३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू

Subscribe

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि.३) १३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. यात नाशिक ग्रामीण १, नाशिक शहर ९, मालेगाव १ आणि जिल्ह्याबाहेरील २ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात दिवसभारत 280 नवीन रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण ८२, नाशिक शहर 1८८ आणि मालेगावमधील १० रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ४ हजार 86४ रूग्ण कोरोनाबाधित असून एकट्या नाशिक शहरात २ हजार ५३२ रूग्ण आहेत.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे मृत रूग्णांचाही आकडा झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग हादरून गेला आहे. कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू सुरू करण्यात आला आहे. मात्र, कर्फ्यूमुळे रूग्णसंख्या आटोक्यात आले नसल्याचे आकडेवाडीवरून दिसून येत आहे. रूग्णांसह त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आरोग्य विभागाकडून नियमित विचारपूस केली जात आहे. मात्र, रूग्ण डॉक्टर व सेवकांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागात नाराजी पसरली आहे. जिल्ह्यात आजवर 2 हजार ७४७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 585, नाशिक शहर 1 हजार २12, मालेगाव 864, जिल्ह्याबाहेरील 8६ रूग्ण आहेत. जिल्ह्यात एकूण १ हजार ७६५ करोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ४३८, नाशिक शहर 1 हजार 16०, मालेगाव 1३२ आणि जिल्ह्याबाहेरील ३५ रूग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

६५० संशयित रूग्ण दाखल
शुक्रवारी दिवसभरात 650 संशयित रूग्ण विविध रूग्णालयात दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय १९, नाशिक महापालिका रूग्णालय ४१8, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ६, मालेगाव रूग्णालय ११, नाशिक ग्रामीण रूग्णालय 17८ आणि गृह विलगीकरणमध्ये १८ रूग्ण आहेत.

६८० अहवाल प्रलंबित
जिल्ह्यात आजवर २३ हजार २६६ संशयित रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यात ४ हजार ७७४ रूग्ण करोनाबाधित आढळून आले असून अद्यापपावेतो ६८० रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यात नाशिक ग्रामीण २०८, नाशिक शहर ३१५, मालेगाव १५७ रूग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

नाशिक कोरोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-४86४ (मृत-२६२)
नाशिक ग्रामीण-१126 (मृत-५१)
नाशिक शहर-२५३२ (मृत-१२२)
मालेगाव-१०७२ (मृत-७६)
अन्य-१३४ (मृत-१३)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -