घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक जिल्ह्यातील साडेतीन हजार विद्यार्थ्यांना ’लॉटरी’

नाशिक जिल्ह्यातील साडेतीन हजार विद्यार्थ्यांना ’लॉटरी’

Subscribe

आरटीई प्रवेश: आजपासून प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ, नर्सरीसाठी ७४ विद्यार्थ्यांना प्रवेश

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेशाची पहिली सोडत जाहीर झाली असून जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये ३५१७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. नर्सरीसाठी ७४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. यंदाच्या वर्षी प्रथमच राज्यस्तरावरून ही सोडत जाहीर करण्यात आली. प्रवेशाबाबतची माहिती पालकांना एसएमएसद्वारे मिळणार आहे.

पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातून निवड झालेल्या मुलांची प्रवेशप्रक्रिया गुरुवार (ता. ११) पासून सुरू होणार आहे. पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशप्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील ४५७ शाळांत ५ हजार ७६४ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी यंदा तब्बल १४ हजार ५५१ ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. जागांच्या तुलनेत जवळपास तीनपट प्रवेश अर्ज आल्याने विद्यार्थी व पालकांचे लक्ष पहिल्या सोडतीकडे लागले होते. या वर्षापासून जिल्हास्तरावर सोडत न काढता थेट राज्यस्तरावर एकाच वेळी सर्व जिल्ह्यांसाठी सोडत जाहीर करण्यात आली. पुणे येथील आझम कॅम्पसमधील उर्दू शाळेत शिक्षण विभागातर्फे लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशाबाबतची माहिती प्रवेश निश्चितीचा संदेश पालकांना १० एप्रिल रोजी मोबाइलवर पाठविला जाणार आहे. त्यानुसार निवड झालेल्या मुलांना प्रवेश घेणे बंधनकारक असेल. निवड होऊनही प्रवेश न घेणारा विद्यार्थी पुढील फेर्‍यांसाठी पात्र राहणार नाहीत.

- Advertisement -

अशी होईल प्रवेशप्रक्रिया

पालकांना एमएसएम प्राप्त होईल. तसेच, www.student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज क्रमांक टाकल्यास लॉटरी लागली आहे की नाही हे पाहता येईल. निवड झाली असल्यास अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून घ्यावी. त्यावर शाळेजवळच्या पडताळणी समितीचे नाव व पत्ता दिला आहे. त्या केंद्रावर जाऊन पडताळणी करून घ्यावी. प्रवेश अर्जात नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित व मूळ प्रती घेऊन पडताळणी करावी. समितीकडून तपासणी झाल्यानंतर विहित मुदतीत शाळेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी.

तालुकानिहाय प्रवेश

बागलाण – ११४
चांदवड – ४७
देवळा – ७५
दिंडोरी – १२३
इगतपुरी – ९४
कळवण – ६१
मालेगाव – १८१
नांदगाव – १०६
नाशिक – १३७
निफाड – ३८५
पेठ – १३
सिन्नर – २०६
सुरगाणा – ६
त्र्यंबक – १४
येवला – १३५

- Advertisement -

मालेगाव (मनपा) – १२०
नाशिक मनपा – १७००

एकूण – ३५१७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -