घरताज्या घडामोडीमालेगावात कोरोनाचा विस्फोट; 32 नवे पॉझिटिव्ह

मालेगावात कोरोनाचा विस्फोट; 32 नवे पॉझिटिव्ह

Subscribe

मालेगावात कोरोनाचा विस्फोट झाला असून, मंगळवारी (दि.२८) सकाळी जिल्हा रुग्णालयास ३६ रुग्णांचे रिपोर्ट प्राप्त झाले. ते सर्व रिपोर्ट मालेगावातील व्यक्तींचे आहेत. त्यामुळे एकट्या मालेगावातील करोनाबाधितांची संख्या 159 झाली असून, जिल्ह्यात एकूण 181 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

सोमवारी मालेगावातील ४३९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, आज ३६ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग हादरून गेला आहे. 36 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 22 पुरुष व 14 महिलांचा समावेश आहे. तसेच चार पॉझिटिव्ह रुग्णांचे दुसऱ्यादा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मालेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. तरीही, मालेगावात कोरोनाचे थैमान सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -