घरमहाराष्ट्रनाशिक४० लाख टन उन्हाळ कांदा सडला

४० लाख टन उन्हाळ कांदा सडला

Subscribe

कांद्याचे दर कोसळल्याने उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. गेले ८ महिने कांदा साठवूनही शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच लागताना दिसत आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी भाववाढ होण्याची वाट बघत आहे आणि या वाट बघण्यात आतापर्यंत ४० कांदा सडला आहे.

सरकारने कांदा साठवणुकीसाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले. परिणामी ८ महिन्यांपेक्षा अधिक काळ चाळीत कांदा टिकवण्यास शेतकर्‍यांना यश मिळाले. लागवडीचे ४ आणि साठवणुकीचे ८ असे बारा महिने थांबून चांगल्या दराची प्रतिक्षा करणार्‍या कांदा उत्पादकांच्या पदरी यंदा निराशाच पडली आहे. बाजारात दिडशे रुपये क्विंटलपर्यंत दर कोसळल्याने शेतकर्‍यांनी उन्हाळ कांदा बाजारात आणणेच थांबवले आहे. देशातील शेतकर्‍यांच्या चाळीतील तब्बल ४० लाख टन कांदा सडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. मागील ४० वर्षात सर्वात नीचांकी दर यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात मिळाल्याने कांदा उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

साठवणुकीनंतर निराशाच

बाजारातील चढ उतारांचा फटका कांद्याला बसत असताना मागील काही वर्षांपासून सरकारी पातळीवरुन कांदा साठवणुकीबाबत प्रचार सुरू आहे. याला शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एप्रिल, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात चाळीत कांदा साठवला गेला. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात दरवर्षी चांगला दर मिळत असल्याचा अनुभव असताना यंदाही शेतकर्‍यांना तेजीची अपेक्षा होती. ऑक्टोबरपासून बाजारात लाल कांद्याची आवक सुरू झाली. लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने त्याचा बाजारावर परिणाम झाला. तब्बल १२ महिने थांबूनही शेतकर्‍यांना अपेक्षित दर मिळाला नाही. डिसेंबरमध्ये तर १०० रुपये क्विंटलपर्यंत दर उतरल्याने यंदा सर्वाधिक नुकसानीस कांदा उत्पादकांना सामोरे जावे लागले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारात मागणी नसल्याने शेतकर्‍यांनी कांदा चाळीत सोडून दिला. यात मोठ्या प्रमाणावर कांदा सडला.
भारतीय बाजाराची दीडशे लाख टनाची कांद्याची गरज आहे. यंदा उत्पादनात अधिक ७० लाख टनाची वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकूण उत्पादनातील ६० टक्के वाटा हा उन्हाळ कांद्याचा असतो. या स्थितीत डिसेंबर अखेरपर्यंत ४० टक्के उन्हाळ कांदा शिल्लक होता. या स्थितीत ४० लाख टनापेक्षा जास्त प्रमाणात कांदा सडला आहे.
– बी.वाय. होळकर,सचिव, लासलगाव बाजार समितीच
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -