घरमहाराष्ट्रनाशिकदेवी भक्तांवर काळाचा घाला; टेम्पो अपघातात नाशिकचे ७ भाविक ठार

देवी भक्तांवर काळाचा घाला; टेम्पो अपघातात नाशिकचे ७ भाविक ठार

Subscribe

मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे-वणी फाट्याजवळ दोन टेम्पोमध्ये रविवारी, २४ फेब्रुवारीला सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका वाहनातील नाशिकच्या ७ भाविकांचा मृत्यू झाला. हे सर्व चांदवड तालुक्यातील केद्राई येथील देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने हा अपघात झाला.

मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे-वणी फाट्याजवळ दोन टेम्पोमध्ये रविवारी, २४ फेब्रुवारीला सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका वाहनातील नाशिकच्या ७ भाविकांचा मृत्यू झाला. हे सर्व चांदवड तालुक्यातील केद्राई येथील देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी येथील राहुलनगरात राहणाऱ्या स्वप्नील कांडेकर यांच्या मुलाच्या जावळाच्या कार्यक्रमानिमित्त नाशिकमधील कांडेकर कुटुंबिय नातवाईकांसह देवीच्या दर्शनासाठी आयशर टेम्पोतून जात होते. महामार्गावरील सर्व्हिसरोडवरुन विरूद्ध दिशेने येणार्‍या वाहनाने हुलकावणी दिल्याने टेम्पोचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट महामार्गावर आला. याचवेळी महामार्गावरुन जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोची भाविकांच्या टेम्पोला धडक बसली. त्यात चार भाविक जागीच ठार झाले तर, एकाचा रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर, ३३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश आहे.

- Advertisement -

पिंपळगाव बसवंत येथे ३३ जखमींवर उपचार सुरू असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये ११ महिलांसह ६ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. जखमी भाविकांना राधाकृष्ण रूग्णालय, धन्वंतरी रूग्णालय, पिंपळगांव बसवंत येथे दाखल करण्यात आले. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केली. अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. खासगी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

अपघातातील मृतांची नावे अशी

सुशीला सुरेश गवळी (६६), निवृती रामभाऊ लोंढे (७०), शोभा जगन्नाथ सूर्यवंशी (६०), सुदाम पाटनकर (६६), समृद्धी डांगे (६ महिने)

- Advertisement -

जखमींची नावे अशी

चंद्रकला डांगे, जयश्री खोसे, अनिता नामगे, प्रदीप नामगे, अलका चौधरी, भाग्यश्री जंगे, मीनाक्षी केशव शिंदे (४०), हिराबाई रघुनाथ कांडेकर (६०), मयुरी योगेश चौधरी (५), आशा दत्तू कांडेकर (४७), स्वाती मस्के, कैलास म्हस्के, अंकिता खोसे (१५), कुणाल वाघ (१९), रीतेश पवार (५), गार्गी पाटनकर (४), रूद्र म्हस्के (५), शिवम म्हस्के, दीपा मोनगे (४), शिवाजी आभाळे (४०), जनार्दन सूर्यवंशी (६७), दत्तात्रय कांडेकर, शांताबाई चव्हाण, समर्थ कोतवाल, सोनाली झेंडे, विनिता कांडेकर, कैलास म्हस्के, स्वाती म्हस्के, सुनील पगारे, अनिकेत खोसे, कृष्णाबाई शिंदे, इंदरेश खान, सुंदराबाई कांडेकर, स्वाती गवळी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -