घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये 52 नवे रूग्ण पॉझिटिव्ह, ४ बाधितांचा मृत्यू

नाशिकमध्ये 52 नवे रूग्ण पॉझिटिव्ह, ४ बाधितांचा मृत्यू

Subscribe

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि.३०) ५२ नवे रूग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 25 आणि नाशिक शहरातील २७ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 4 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर 1, नाशिक ग्रामीण 2 आणि मालेगावातील एकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ३१ मे रोजी जिल्ह्यात १ हजार २२४ करोनाबाधित रूग्ण होते. १ जून रोजी जिल्ह्यात १ हजार २५५ आणि नाशिक शहरात २३४ बाधित रूग्ण होते. तर, जूनअखेर जिल्ह्यात ४ हजार ११४ रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात २ हजार ८० रूग्ण आहेत. त्यामुळे जून महिन्यात तब्बल २ ह्जार ८९० नवे रूग्ण आढळून आले आहेत.

नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला आहे. रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने शासकीय रूग्णालयांसह शहरात २१ खासगी रूग्णालयांमध्ये रूग्णांवर उपचार सुरू केले जात आहेत. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब तपासणीस पाठविले जात असून त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जून महिन्यात पाचव्यांदा लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, लॉकडाऊन शिथील असल्याने नागरिक घराबाहेर आले. त्यातून करोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे रूग्णसंख्येवरून दिसून येत आहे.
जिल्ह्यात आजवर 2 हजार 340 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 516, नाशिक शहर 931, मालेगाव 815 आणि जिल्ह्याबाहेरील 78 रूग्णांचा समावेश आहे. सध्या 1 हजार 536 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण 316, नाशिक शहर 1044, मालेगाव 141, जिल्ह्याबाहेरील 35 रूग्णांचा समावेश आहे. मंगळवारी दिवसभरात 309 संशयित रूग्ण दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय 10, नाशिक महापालिका रूग्णालय 182, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 7, मालेगाव रूग्णालय 12, नाशिक ग्रामीण रूग्णालयात 98 रूग्ण दाखल झाले.

- Advertisement -

शहरात १५ नवीन प्रतिबंधित क्षेत्र, १८ निर्बधमुक्त

नाशिक शहरात मंगळवारी नवीन रूग्ण आढळून आल्याने १५ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे-हंसराज अपार्टमेंट-देवळाली गाव, साई रो-हाऊस-सातपूर, प्रशांत इमारत-संजय गांधीनगर-उपनगर, खुशी रेसिडेन्सी-स्वामी विवेकानंदनगर-मखमलाबाद, स्वस्तिक अपार्टमेंट-बोरगड, महादेव कॉलनी-मखमलाबाद, विवेकानंदनगर-मखमलाबाद, कल्पेश्वर बंगला-मखमलाबाद, ऋषिराज हाईट्स-गंगापूररोड, ध्रुवनगर-सातपूर, श्रीकृष्णनगर-सातपूर, टाकळी रोड-कथडा, भीमवाडी, संतकबीरनगर-व्दारका, पेठ गल्ली-गंगापूर. १४ दिवसांत नवीन रूग्ण आढळून न आल्याने १० प्रतिबंधित क्षेत्र निर्बंधमुक्त करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे – कोठुळे मळा-लॅमरोड-विहितगाव, सुंदरनगर-देवळालीगाव, साईबाबानगर-सिडको, सत्यम पॅलेस अपार्टमेंट-कलानगर-पंचवटी, भास्कर प्लॅनेट-लामखेडे मळा-पंचवटी, गजानन अपार्टमेंट-पेठरोड-पंचवटी, पेटकर प्लाझा-मखमलाबादनाका, पवनपुत्र सोसायटी-हिरावाडी, म्हाडा घरकुल-भारतनगर, डेल्टा रॉयल-पखाल रोड, अली अन्सारी व्हिला-साईनाथनगर-वडाळारोड, पोलीस मुख्यालय नवीन इमारत, राधा-रमन इमारत-जनरल वैद्यनगर, निलोदय बंगला-जत्रा हॉटेलजवळ-आडगाव, गोकुळधाम सोसायटी-शक्तीनगर-हिरावाडी, नंदादीप बंगला-जगतापमळा-नाशिकरोड, मयुर रूग्णालय-सिडको, कोचर सदन-जयभवानीरोड-नाशिकरोड.

- Advertisement -

पॉझिटिव्ह रूग्ण-4114 (मृत-238)

नाशिक ग्रामीण-879(मृत-47)
नाशिक शहर-2080 (मृत-105)
मालेगाव शहर-1031(मृत-75)
जिल्ह्याबाहेरील-124 (मृत-11)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -