घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये ६५ लाखांचा दमण निर्मित अवैध मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त

नाशिकमध्ये ६५ लाखांचा दमण निर्मित अवैध मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त

Subscribe

नाशिक जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत नाशिक – देवळा रोडवर खेलदरी शिवारात परराज्यातून विक्रीसाठी आणल्या जाणारा मद्याचा तब्बल ६५ लाख ९१ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या साठ्यात महाराष्ट्रात बंदी असलेल्या आणि दमण राज्यातच विक्रीसाठी उत्पादीत केलेल्या रॉयल स्पेशल ओल्ड विस्की, जॉन मार्टिन प्रिमियम व्हिस्की, किंगफिशर स्ट्राँग बिअर अशा ब्रँडेड दारुचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला राज्यात बंदी असलेला मद्याचा साठा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आयुक्त अश्विनी जोशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, चरणसिंग राजपुत आणि नाशिक अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाने वाहन तपासणी सापळा रचला. या तपासणीत गुजरात राज्यातील टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक पकडण्यात आला. ज्यामध्ये रॉयल स्पेशल ओल्ड विस्की ब्रँडच्या २४ हजार सिलबंद बाटल्या होत्या, ज्याची किमंत २९ लाख आहे. जॉन मार्टिन व्हिस्कीच्या १९२० बाटल्यांची अंदाजे किमंत अडीच लाख, किंगफिशर स्ट्राँग बिअरच्या १३,८०० टीनची किमंत १६ लाख ५६ हजार तर पकडण्यात आलेल्या टाटा कंपनीच्या ट्रकची किमंत अंदाजे १२ लाख असल्याचे भरारी पथकाने सांगितले आहे. या ट्रकसोबतच एक निळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडीही जप्त करण्यात आली आहे, तिची किमंत अंदाजे ६ लाख असून त्यासोबत सात मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, असा एकूण ६५ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (इ), ८१, ८३, ९० नुसार जावीद अल्लाउद्दीन तेली (वय ३१), अमर कैलास वर्मा (वय २२), राहुल राजू गायकवाड (वय २८), शदरभाई ठाकुर (वय ३७) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संघटित टोळीची शक्यता

- Advertisement -

गेल्या महिन्यात विभागात व्यापक कारवाई करत मोठा बनावट आणि चोरट्या पद्धतीने नेला जाणारा मद्यसाठा जप्त केलामात्रत्यानंतरदेखील हे प्रकार सुरूच आहेतगुन्हेगार प्रत्येक वेळी नवनव्या पद्धती वापरत आहेतबुधवारी आमच्या पथकाने सुमारे २५ किलोमीटर पाठलाग करून वाहन ताब्यात घेतलेया घटनेतून या सर्व प्रकारांमागे संघटित टोळीचा हात असण्याची शक्यता वाटते आहे. – प्रसाद सुर्वेउपायुक्तराज्य उत्पादन शुल्क विभाग

 


#Live :आता नाशिकची जगाला नव्यानं ओळख होणार; ‘आपलं महानगर’ आजपासून नाशिकमध्ये!मान्यवरांच्या उपस्थितीत आज प्रकाशन सोहळा

'आपलं महानगर' आजपासून नाशिकमध्ये!मान्यवरांच्या उपस्थितीत आज प्रकाशन सोहळा

#Live : आता नाशिकची जगाला नव्यानं ओळख होणार; 'आपलं महानगर' आजपासून नाशिकमध्ये!मान्यवरांच्या उपस्थितीत आज प्रकाशन सोहळा | #MyMahanagar

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, January 17, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -