घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यातील ७ हजार सैनिक बजावणार मतदानाचा हक्क

जिल्ह्यातील ७ हजार सैनिक बजावणार मतदानाचा हक्क

Subscribe

देशाच्या सीमेवरील सैनिकांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, या उद्देशाने निवडणूक आयोगाकडून प्रथमच ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जात आहे.

देशाच्या सीमेवरील सैनिकांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, या उद्देशाने निवडणूक आयोगाकडून प्रथमच ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जात आहे. जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदार संघातील एकूण ७ हजार ३१९ सैनिकांनी जिल्हा निवडणूक कार्यालयात यासाठी नोंदणी केली आहे. या मतदारांसाठी ईटीपीबीएस प्रणालीव्दारे ऑनलाइन मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.

देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. मात्र, सीमावर्ती भागात देशाचे संरक्षण करणार्‍या सैनिकांना काही कारणास्तव मतदान करता येत नाही. पोस्टाने पाठविलेली मतपत्रिका मतमोजणीच्या तारखेपर्यंत पोस्टाने प्राप्त होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने सी-डॅकच्या मदतीने ऑनलाईन मतपत्रिका पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मतपत्रिका ऑनलाईन पाठविल्यामुळे सैनिकांना तात्काळ मिळतील. तसेच मतदान व मतमोजणी यात एक महिन्याचा कालावधी असल्याने पोस्टाने मतपत्रिका वेळेत पोहचणार आहेत. त्यामुळे सर्व सैनिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात ३ हजार २२, तर दिंडोरी मतदारसंघात ४ हजार २९७ सैनिक मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

असे करता येईल मतदान

या प्रणालीअंतर्गत निवडणूक आयोगाच्या वतीने भुदल, वायुदल, सागरी दलाचे सैनिक कार्यरत असलेल्या ठिकाणी रेकॉर्ड ऑफिसरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या रेकॉर्ड ऑफिसरच्या माध्यमातून संबंधित जवानांच्या ई-मेलवर किंवा त्यांच्या रेकॉर्ड ऑफिसच्या ठिकाणी ई-मतपत्रिका पाठविण्यात येणार आहेत. याबरोबरच मेलवर प्रतिज्ञापत्रकदेखील असणार आहे. प्रत्येक सैनिकासाठी एक पिन क्रमांक जनरेट होणार असून, हा पिन टाकल्यानंतर त्याची प्रिंट काढता येणार आहे. ही प्रिंट काढल्यानंतर या ई-मतपत्रिकेवर सैनिकांना मतदान करता येणार आहे. मतदान केल्यानंतर खास निवडणूक आयोगाने पुरविलेल्या लिफाफ्याद्वारे सैनिकाने मतपत्रिका लोकसभेतील नोडल ऑफिसरला प्राप्त होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -