घरमहाराष्ट्रनाशिकअनुदानावर पशुपालनासाठी ७ हजार अर्ज

अनुदानावर पशुपालनासाठी ७ हजार अर्ज

Subscribe

जिल्हाधिकारयांच्या उपस्थितीत २७३ लाभार्थ्यांची यादी जाहीर

ग्रामीण भागातील शेतकरी व पशू पालकांना अर्थाजनाचे व स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसवंर्धन विभागाच्यावतीने पशुपालनासाठी अनुदान जनावरे दिली जातात. या योजनेंगर्तत जिल्हयात ७ हजार २२७ अर्ज प्राप्त झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्राप्त अर्जातून २७३ प्राथमिक पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली.

या योजनेत लाभार्थ्यांना एकूण दोन संकरित गायी किंवा दोन दुधाळ म्हशींचे वाटप करण्यात येणार आहे. यात शेळी गटासाठी १० शेळया आणि एक बोकड यांच्यासाठी ८७ हजार ८७५ इतकि रक्कम देण्यात येणार आहे. सर्वसाधारण गटासाठी लाभार्थ्यांना गट किमतीच्या ५० टक्के अनुदान आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. हाच निकष दोन गायी किंवा दोन म्हशींसाठीच्या गटाला लावण्यात आला आहे. या गटाची किंमत ८५ हजार ६१ ठेवण्यात आली आहे. पोल्ट्रीच्या एक हजार पक्षांसाठी दोन लाख २५ हजार रक्कम ठेवण्यात आली असून यात शेडसाठी अनुदान दिले जाणार आहे. यात एससी व एसटीसाठी १ लाख ६८ हजार तर सर्वसाधारण गटासाठी १ लाख १२ हजार ५०० रूपये अनुदान देय आहे. शासनाच्या या योजनेमुळे बेरोजगारांना काम मिळण्यास दुग्ध उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

तालुकानिहाय प्राप्त अर्ज

नादंगाव १३०६, इगतपुरी ३६३, कळवण २१२, चांदवड ७१२, त्रयंबकेश्वर ५६, देवळा ४२८, दिंडोरी २२४, नाशिक १५२, निफाड ६०६, पेठ ४१, मालेगाव ५४५, येवला ९०१, सुरगाणा ११९, सिन्नर ७८७, बागलाण ७७५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -