घरताज्या घडामोडीविनाकारण भटकणाऱ्या 76 जणांवर गुन्हे 

विनाकारण भटकणाऱ्या 76 जणांवर गुन्हे 

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही शहरात घराबाहेर विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली. शुक्रवारी शहरात फेरफटका मारणाऱ्या 76 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात एक कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. लोकांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात घरीच थांबणे आवश्यक आहे, सोशल डिस्टन्स ठेवावा, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असे वारंवार सूचना देऊनही लोक घराबाहेर पडत आहेत. शहरात लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी दिवसभरात पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांना 76 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.

- Advertisement -

12 दिवसांत 946 जणांवर गुन्हे

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्स ठेवावा, असे आवाहन पोलीस वारंवार करत आहेत. तरीही, काहीजण घराबाहेर विनाकारण आले, अशा 946 जणांवर पोलिसांनी 12 दिवसांत गुन्हे दाखल केले आहेत. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -