घोटी टोल नाक्यावर साडेआठ लाखांची रोकड जप्त

विधानसभा निवडणूक जोर धरत असताना निवडणूक विभागाच्या स्थायी निगराणी पथकाने सोमवारी (दि. ३०) घोटी टोल नाक्यावर संशयास्पद वाहनातून ८ लाख ८३ हजारांची रोख रक्कम जप्त केली.

NASHIK
haryana government starts doorstep delivery cash you need book slot only rkp
बँकेत जाऊन पैसे काढण्याची चिंता सोडा; घरबसल्या पैसे मिळवा

विधानसभा निवडणूक जोर धरत असताना निवडणूक विभागाच्या स्थायी निगराणी पथकाने सोमवारी (दि. ३०) घोटी टोल नाक्यावर संशयास्पद वाहनातून ८ लाख ८३ हजारांची रोख रक्कम जप्त केली. विशेष म्हणजे यामध्ये ५ आणि १० रुपयांच्या नाण्यांची एकूण रक्कम ८३ हजार आहे. भरारी पथकप्रमुख अरविंद पगारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चिल्लर आणि रक्कम इगतपुरी उपकोषागार कार्यालयात सील केली.

विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढत चालला आहे. अवैध पैसे आणि मद्याचा पूर वाढत असल्याच्या घटनांवर लक्ष दिले जात आहे. यानुसार निवडणूक यंत्रणेचे स्थायी निगराणी पथक अरविंद पगारे यांच्या नेतृत्वाखाली घोटी येथील टोल नाक्यावर सक्रिय आहे. मुंबईकडून नाशिककडे जाणारे वाहन (एमएच-05-सीएम- 8620) याची पगारे यांनी तपासणी केली. यामध्ये 500 रुपयांच्या 1600 नोटा अशी 8 लाखाची रक्कम, 5 आणि 10 रुपयांची 83 हजारांची नाणी अशी 8 लाख 83 हजारांची रक्कम आढळून आली. वाहनचालक अनिलकुमार शिंदे, मालक सुनील हजारी यांना ह्या रकमेबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही. यामुळे ही रक्कम जप्त केली. पगारे यांच्या नेतृत्वाखाली शिवचरण कोकाटे, पुंडलिक बागूल, विलास धारणकर, कॅमेरामन अमित बोधक यांनी ही कारवाई केली. रक्कमेत 83 हजारांची नाणी असल्याने मोजदाद करताना दमछाक झाली. संपूर्ण रक्कम इगतपुरी उपकोषागार अधिकारी अण्णासाहेब भडांगे यांच्या ताब्यात दिली. रक्कम सीलबंद करून सुरक्षित ठेवली आहे.