Corona : दिलासादायक नाशकात 983 कोरोनामुक्त, 872 पॉझिटिव्ह

दिवसभरात १२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. मंगळवारी (दि.6) दिवसभरात 872 नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले तर 983 रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 87 टक्के आहे. जिल्ह्यात सध्या 9 हजार 177 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण 4 हजार 354, नाशिक शहर 4 हजार 285, मालेगाव 410 आणि जिल्ह्याबाहेरील 128 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाबाधितांमध्ये नाशिक ग्रामीण 234, नाशिक शहर 589, मालेगाव 28 आणि जिल्ह्याबाहेरील 21 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 12 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर 7 आणि नाशिक ग्रामीण 5 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात संशयित रुग्ण नाशिक महापालिका रुग्णालयात 1 हजार 480, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 15, मालेगाव रुग्णालय 13 आणि नाशिक ग्रामीण रुग्णालय 165 रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक कोरोना अपडेट

आजखेर घेतलेले स्वॅब – 2,85,720
पॉझिटिव्ह रुग्ण – 81,895
निगेटिव्ह रुग्ण – 2,01,936
उपचार घेणारे पॉझिटिव्ह रुग्ण – 9,177
कोरोनामुक्त झालेले रुग्ण – 71,255
कोरोनाबाधित मृत रुग्ण – 1,463