घरताज्या घडामोडीघरात घुसून सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याचा राडा

घरात घुसून सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याचा राडा

Subscribe

जुन्या भांडणातून बंदुक, कोयता, लाकडी दांडके घेवून टोळक्याने एकाच्या घरात बळजबरीने घुसून दहशत निर्माण करत तोडफोड करुन ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि.२६) सकाळी ११ वाजेदरम्यान लक्ष्मीनगर, पेठरोड परिसरात सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी सोनी जाधव (रा. पेठरोड, पंचवटी) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सहा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

प्रशांत अशोक जाधव (२७, श्रीधर कॉनी, म्हसरूळ), योगेश प्रल्हाद लांबडे (२४, जकात नाका, म्हसरूळ), रोहन प्रभाकर निकम (२८, टाकळीरोड, जयभवानीनगर), अंकुश भुषण सोनवणे (२५, बोधलेनगर, नाशिक), मयुर विवेकांनद वाघमारे (२३, दत्तमंदिर कॉलनी, उपनगर), जतीन दिलीप साळुंके (१८, पंचवटी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या भावाच्या ओळखीचे सहाजण आहेत. जुन्या भांडणाच्या कारणातून सहा ते सातजणांच्या टोळक्याने त्यांच्या घरात बळजबरी प्रवेश केला. टोळक्याने पिस्तुल, कोयते, चाकू अशी हत्यारे उगारून जाधव कुटुंबियांना शिवीगाळ करत मारहाण केली. कोयत्याने घरातील साहित्याची तोडफोड करत कोयत्याचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. टोळक्याने घरातील कपाटातील सहा हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर सर्वजण दुचाकीवरुन निघून गेले. सर्व संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सहाजणांना अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -