आप, वंचित आघाडी दिंडोरीच्या आखाड्यात

नाशिक लोकसभा मतदारसंघात युती व आघाडीत उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू असताना आप, बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी त्यांना आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ‘आप’तर्फे माजी सनदी अधिकारी टी. के. बागूल यांची उमेदवारी निश्चित झाली असून बहुजन वंचित आघाडीने आपला उमेदवार देण्यासाठी शुक्रवारी मुंबईत बैठक बोलवली आहे.

Nashik
dindori loksabha constituency
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

नाशिक लोकसभा मतदारसंघात युती व आघाडीत उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू असताना आप, बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी त्यांना आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ‘आप’तर्फे माजी सनदी अधिकारी टी. के. बागूल यांची उमेदवारी निश्चित झाली असून बहुजन वंचित आघाडीने आपला उमेदवार देण्यासाठी शुक्रवारी मुंबईत बैठक बोलवली आहे. यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक जाधव यांचे नाव अग्रेसर आहे.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधार्‍यांचा पराभव करण्यासाठी महागठबंधन आणि वंचित बहुजन आघाडी पुढे सरसावलेली असताना यात ‘आप’ प्रणित समृद्ध महाराष्ट्र आघाडीची भर पडली आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ’समृद्ध महाराष्ट्र आघाडी’ तर फक्त विदर्भासाठी ’विदर्भ निर्माण महामंच’ मार्फत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेले टी. के. बागूल यांनी प्रथमत: राष्ट्रवादीचे दार ठोठावले. मात्र, उमेदवारांच्या रांगेत आपला तीसरा क्रमांक लागत असल्याचे बघून त्यांनी ‘भुजबळ फार्म’चा नाद सोडून आपची उमेदवारी पदरात पाडून घेतली. बागुल माजी सनदी अधिकारी असले तरी त्यांना कोणत्या मुद्यांवर निवडणूक लढवायची याचा नेमका धागा पकडण्यात अपयश आल्याचे दिसते. अचूक मुद्दे घेऊन प्रचाराच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यात त्यांचा कस लागणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी मोठी प्रचार यंत्रणा असावी लागते. त्यादृष्टीने ’आप’ला गांभीर्याने विचार करावा लागेल. निवडणुकीचा गड सर करण्याच्या तयारीत उतरलेल्या बहुजन वंचित आघाडीलादेखील उमेदवार देताना या मुद्यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.

केवळ उमेदवाराच्या नावाने निवडणूक लढवणे सोपे राहिलेले नाही. विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी तीन वेळा येथे बाजी मारली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या मातब्बर उमेदवारांनादेखील त्यांना पाडण्यात आजवर अपयश आल्याचे दिसून येते. यंदा परिस्थिती वेगळी वाटत असली तरी केवळ जातीय मतांचे ध्रुवीकरण करून निवडणूक जिंकता येणार नाही, याची जाणिव प्रत्येक उमेदवाराला आहे. दिंडोरी लोकसभेत फक्त कळवण व दिंडोरीच्या उमेदवारांचा बोलबाला राहिला; किंबहुना त्यांच्यापर्यंत उमेदवारीचे समीकरण फिरत राहिल्याने येवला, नांदगाव, चांदवड, देवळा तालुक्यातील उमेदवारांची निराशा होते. हा पूर्वानुभव विचारात घेऊन बहुजन वंचित आघाडी या भागातून उमेदवार देण्याच्या प्रयत्नात दिसते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक जाधव यांचे नाव पुढे येते. अर्थात, मुंबई येथील बैठकीनंतर त्यांचे नाव अधिकृतपणे
जाहीर केले जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here